देशभरात पासपोर्टसाठी १४९ सेवा केंद्रे सुरु करणार

तुम्हाला पासपोर्ट बनवायचा आहे तर ही तुमच्यासाठी आहे महत्त्वाची बातमी. आता पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला जास्त दूर जावे लागणार आहे. ५० किमी अंतरावर पोस्टपार्टसाठी सेवाकेंद्र बनवण्याची सरकारने घोषणा केलीये.

Updated: Jun 18, 2017, 08:29 AM IST
देशभरात पासपोर्टसाठी १४९ सेवा केंद्रे सुरु करणार title=

नवी दिल्ली : तुम्हाला पासपोर्ट बनवायचा आहे तर ही तुमच्यासाठी आहे महत्त्वाची बातमी. आता पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला जास्त दूर जावे लागणार आहे. ५० किमी अंतरावर पोस्टपार्टसाठी सेवाकेंद्र बनवण्याची सरकारने घोषणा केलीये.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी देशभरात १४९ नवी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार असल्याची घोषणा केली. दिल्लीत तीन नवी केंद्र उभारण्यात येणार आहेत. कृष्णानगर, लोधी रोड, साकेतमध्ये नवी केंद्रे उभारली जाणार आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक १९ जिल्ह्यांमध्ये अशी केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. सरकारच्या नव्या घोषणेसह पासपोर्ट केंद्रांची संख्या २५१ झालीये.