टू व्हीलर खरेदी करण्याच्या विचारात आहात, तर हे नक्की वाचा

सध्या दुचाकी वाहनांवर 28 टक्के जीएसटी आकारला जात आहे.

Updated: Aug 26, 2020, 10:50 AM IST
टू व्हीलर खरेदी करण्याच्या विचारात आहात, तर हे नक्की वाचा title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : टू-व्हीलर सामन्यांची सवारी म्हणून ओळखली जाते. परंतु टू-व्हीलरवर लावण्यात येणारा GST हा लक्झरी वस्तूप्रमाणे मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात येतो. त्यामुळे केंद्र सरकार वाहन क्षेत्रातील दुचाकी उद्योगासाठी जीएसटीबाबत मोठी घोषणा करु शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दुचाकी दरावरील जीएसटी कमी करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या दुचाकी वाहनांवर 28 टक्के जीएसटी आकारला जात आहे.

 वाहन क्षेत्रातून आलेली ही चांगली सूचना आहे. टू-व्हीलर लक्झरी वस्तू नाही किंवा ती अहितकारी वस्तूही नाही. त्यामुळे टू-व्हीलरवरील जीएसटीबाबतचा प्रस्ताव जीएसटी काउंसिलच्या बैठकीत मांडणार असल्याचं, निर्मला सीतारमण यांनी सांगतिलं

भारतीय उद्योग परिसंघ संघटनेने (CII) जारी केलेल्या निवेदनात सांगितलं की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उद्योग क्षेत्राकडून मिळालेली ही चांगली सूचना असल्याचं सांगतिलं आहे. त्यामुळे दुचाकीच्या जीएसटी दरात बदल करण्याचा विचार केला जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं हे विधान 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी आलं होतं. त्यामुळे होणाऱ्या बैठकीत दुचाकी वाहनांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असं झाल्यास येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांत दुचाकीच्या मागणीत वाढ होऊन, विक्रीही वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्या दुचाकींची विक्री मोठी प्रमाणता कमी झाली आहे.