नवी दिल्ली : देशात अनेक सक्तीचे नियम लागू केल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचं चित्र समोर आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी १ सप्टेंबरपासून देशात अनलॉक ४ सुरू होणार आहे. देशात अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात सरकार काही नियम शिथिल करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
India's #COVID19 case tally crosses 32 lakh mark with 67,151 fresh cases and 1,059 deaths in the last 24 hours.
The COVID-19 case tally in the country rises to 32,34,475 including 7,07,267 active cases, 24,67,759 cured/discharged/migrated & 59,449 deaths: Ministry of Health pic.twitter.com/pfoJqCg2FY
— ANI (@ANI) August 26, 2020
भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ६७ हजार १५१ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ५९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३२ लाख ३४ हजार ४७५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ५९ हजार ४४९ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ७ लाख ७ हजार २६७ रुग्णांवर उपचार सुरू असून २४ लाख ६७ हजार ७५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगळवारी देशात ८ लाख २३ हजार ९९२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर संपूर्ण देशात आता पर्यंत ३,७६,५१,५१२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.