Aadhaar Verification | आधार पडताळणीसाठी सरकारकडून नवीन नियम जारी; जाणून घ्या अन्यथा...

Aadhaar Latest News | सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, आधार धारकाला सत्यापन एजन्सीला नकार देण्याचा अधिकार आहे. तसेच आधार धारकाचा कोणताही ई-केवायसी डेटा संग्रहित केला जाऊ नये. जाणून घ्या नक्की प्रकरण...

Updated: May 31, 2022, 01:08 PM IST
Aadhaar Verification | आधार पडताळणीसाठी सरकारकडून नवीन नियम जारी; जाणून घ्या अन्यथा...  title=

मुंबई : Aadhaar Latest News | आधार कार्ड हे भारतातील अनिवार्य दस्तऐवज आहे. त्याशिवाय देशात कोणतेही काम होऊ शकत नाही. UIDAI सुद्धा आधारशी संबंधित माहिती वेळोवेळी देते. सरकारने आधार पडताळणीबाबत नवा नियम केला आहे. नियमानुसार, तुम्ही तुमचा आधार ऑफलाइन किंवा कोणत्याही इंटरनेटशिवाय  Verification करता येईल.

सरकारने नवीन नियम केले जारी

नियमांनुसार, आता तुम्हाला पडताळणीसाठी डिजिटली स्वाक्षरी केलेले दस्तऐवज सादर करावे लागतील. ही डिजिटल स्वाक्षरी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केलेल्या दस्ताऐवजावर हवी.  या दस्तऐवजवर यूजरच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक दिलेले असतात.

या नवीन नियमात, आधार धारकाला आधार ई-केवायसी पडताळणी प्रक्रियेसाठी, कोणत्याही अधिकृत एजन्सीला आपला आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यानंतर एजन्सी आधार धारकाने दिलेला आधार क्रमांक आणि नाव, पत्ता इत्यादी केंद्रीय डेटाबेसशी जुळवेल. जुळणी बरोबर असल्याचे आढळल्यास पडताळणीची प्रक्रिया पुढे नेली जाते.

आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी म्हणजे डिजिटल स्वाक्षरी असलेला दस्तऐवज जो UIDAI द्वारे जारी केला जातो. या दस्तऐवजात आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक, नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख आणि फोटो यांची माहिती असते. 

महत्वाचं म्हणजे सरकारने जारी केलेला हा नवीन नियम आधार धारकांना 'त्यांचा कोणताही ई-केवायसी डेटा संग्रहित केला जाऊ नये'. हे एजन्सीला सांगण्याचा अधिकार देतो.

ऑफलाइन आधार पडताळणीचे प्रकार

नियमांनुसार, UIDAI खालील प्रकारच्या ऑफलाइन पडताळणी सेवा प्रदान करेल.

- QR कोड पडताळणी

- आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी पडताळणी

- ई-आधार पडताळणी

- ऑफलाइन पेपर आधारित पडताळणी

आधार पडताळणी पद्धती

-  डेमोग्राफिक प्रमाणीकरण

- वन-टाइम पिन आधारित प्रमाणीकरण

- बायोमेट्रिक आधारित प्रमाणीकरण

- मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन