मुंबई : गुरुग्राम स्थित एका खाजगी कंपनीचे संस्थापक आणि संचालक राजेश सिंग यांनी अलीकडेच एका एजंटची लिंक्डइनवर कहाणी शेअर केली. ही स्टोरी त्यांच्या परिसरातील लोकांच्या घरी गॅस सिलिंडर पोहोचवणाऱ्याची आहे. या पोस्टच्या माध्यमातून एजंटच्या जीवनाची एक झलक दाखवली आणि देशातील अनेक पदवीधर हे त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी स्तरावर काम करत आहेत, हे सांगितले आहे. राजेश सिंग यांच्या या पोस्ट ला LinkedIn वर 42,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून 500 पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, ही पोस्ट देशातील सध्याच्या बेरोजगारीच्या वातावरणाबद्दल आणि अनेक तरुणांची वास्तविक परिस्थिती सांगते.
पोस्टच्या सुरुवातीला राजेश सिंह यांनी सांगितले की, त्यांचा डिलिव्हरी एजंट इंग्रजीत संभाषण करू शकतो हे जाणून त्यांना धक्का बसला. भारतीय समाजात आजही अनेक लोक विचित्र नोकऱ्या किंवा रोजंदारीवर काम करणारे इंग्रजी बोलतात याबद्दल आश्चर्य वाटते. लोकांचा असा विश्वास आहे की मजूर किंवा कमी पैसे कमावणाऱ्या लोकांना इंग्रजी येत नाही. घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवणाऱ्या एजंटचे अस्खलित इंग्रजी बोलणे ऐकून राजेश सिंग यांना आश्चर्य वाटण्याचे कारण कदाचित हेच असावे. तरुणाशी बोलल्यानंतर त्यांना कळले की, सुलतानपूरचा २४ वर्षीय संदीप यादव हा सायन्स ग्रॅज्युएट आहे.
संदीप यादव दररोज सुमारे 25 ते 30 सिलिंडरचे पोहोचवण्याचे काम करतो आणि त्याला त्यासाठी 12 हजार रुपये महिन्याला पगार मिळतो. ग्रॅज्युएशननंतर अशा नोकरीची निवड का केली असे विचारले असता, तो म्हणाला की ही एकमेव नोकरी आहे जी तो सुरक्षित करू शकतो. यामुळे त्याला खूप मोठी रक्कम मिळाली, ज्याद्वारे तो त्याच्या गावातल्या वृद्ध आईवडिलांना आधार देऊ शकला. तो महिन्याला कमावलेल्या 12 हजारपैकी 8 गजार घरी पाठवतो आणि उरलेल्या 4 हजारांवार महिन्याला उदरनिर्वाह करतो.