Corona : कोरोनाचा वाढता धोका, सरकारचा मास्कबाबत मोठा निर्णय

महाराष्ट्रात कोरोनाच्या BF.7 या नव्या व्हेरिएंटनं प्रवेश (new omicron variant) केलाय.

Updated: Oct 20, 2022, 05:50 PM IST
Corona : कोरोनाचा वाढता धोका, सरकारचा मास्कबाबत मोठा निर्णय title=

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या BF.7 या नव्या व्हेरिएंटनं प्रवेश (new omicron variant) केलाय. पुण्यात या व्हेरिएंटचा रुग्ण सापडला आहे. कोरोनाचा धोका वाढू नये आणि पुन्हा नको ती स्थिती उद्भवू नये म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई महापालिकेने (Bmc) कोरोनाचा धोका पाहता (Mumbai Corona Guideline) नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशातच आता सरकारने मास्कबाबत (Mask) मोठा निर्णय घेतला आहे. (now no fine of Rs 500 for not applying mask in public places at delhi)

आता दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 500 रुपये दंड भरावा लागणार नाही. दिल्ली सरकारने गुरुवारी यासंबंधीचा आदेश मागे घेण्याची अधिसूचना जारी केली. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (DDMA) एक बैठक पार पडली. या बैठकीत राजधानीत कोरोनाची घटती रुग्णसंख्या लक्षात घेता 30 सप्टेंबरपासून दंड न आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली नव्हती.  

बीएमसीच्या मार्गदर्शक सूचना (Bmc Corona Guideline)

अद्याप लसीकरण केले नसेल, तर ही चांगली वेळ आहे.  तुमची रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात आली असेल किंवा धोका असेल तर, बूस्टर तुमची व्हायरसपासून प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतात.

घरात हवेशीर वातावरण ठेवा, कारण बंद खोल्यांमध्ये व्हायरस पसरण्यास मदत होते.

लक्षणं असलेल्या रुग्णांशी जवळचा संपर्क टाळा

वारंवार हात धुवा

शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/टिश्यू पेपर वापरा.

संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणं. 

लक्षणे दिसू लागताच चाचणी करा. परिणामांची वाट पाहत असताना, स्वत: ला इतरांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण संक्रमणाची साखळी तोडू शकता.