हज यात्रेनंतर हिंदू यात्रांसाठीचंही अनुदान बंद होणार? - ओवैसी

मुस्लिमांना हज यात्रेसाठी देण्यात येणारं अनुदान केंद्र सरकारनं रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळं यंदापासून मुस्लिमांना हज यात्रेला जाण्यासाठी अनुदान देण्यात येणार नाही. 

Updated: Jan 17, 2018, 12:26 PM IST
हज यात्रेनंतर हिंदू यात्रांसाठीचंही अनुदान बंद होणार? - ओवैसी  title=

नवी दिल्ली : मुस्लिमांना हज यात्रेसाठी देण्यात येणारं अनुदान केंद्र सरकारनं रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. यावर एमआयएमचे खासदार यांनी भाजप सरकारला हिंदू यात्रांसाठी दिलं जाणारं अनुदान बंद करण्याचं आव्हान दिलंय.

सर्वोच्च न्यायालयानं २०१२ साली दिलेल्या निर्देशानुसार सरकारनं हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.

हज यात्रेसाठी ७०० कोटींचं अनुदान देण्यात येत होतं. या अनुदानाची रक्कम आता मुस्लीम विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरण्यात येणार असल्याचंही नक्वींनी सांगितलं. 

नेमकं यंदापासूनच सौदी अरेबियानं भारताच्या हज यात्रेकरूचा कोटा ५ हजारांवरून १ लाख ७५ हजारांपर्यंत वाढवलाय. त्यामुळं यंदा हजच्या यात्रेकरूंच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारनं अनुदान रद्द केल्यामुळं हज यात्रेकरूंना त्याचा लाभ मिळणार नाही. 

दरम्यान, अनुदान रद्द केल्यानंतर वाचलेली रक्कम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुस्लिम समाजातल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च व्हावी, अशी अपेक्षा काँग्रेसनं व्यक्त केलीय. तर एमआयएमचे खासदार असऊद्दीन ओवेसी यांनी हिंदू मंदिरं आणि यात्रांना दिलं जाणारं अनुदान सरकार बंद करणार का? असा सवाल केलाय.