नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांतने आपल्या राजकीय इनिंगची घोषणा केल्यानंतर सुपरस्टार कमल हसनने राजकारणात प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कमल हसन २१ फेब्रुवारीला तामिळनाडुतील रामनाथपुरम येथे राजनितिक पार्टीची घोषणा करणार आहे.
याच दिवशी आपली राजनितिक ताकद दाखविण्यासाठी तो राज्यव्यापी यात्रेलादेखील सुरूवात करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार हसन वेगवेगळ्या चरणात आपली राज्यव्यापी यात्रा पूर्ण करणार आहे. पहिल्यांदा गृहजनपद रामानाथपुरमपासून मधुराई, दिंडीगुल आणि सिवगंगईची यात्रा करणार आहे. राजकारणात येण्याची इच्छा त्याने याआधी व्यक्त केली होती.
कोणत्या राजकीय पक्षासोबत काम करण्यापेक्षा स्वत: ची पार्टी काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सर्वसाधारण माणसांना कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो ? , राजकारण्यांकडून त्यांच्या काय अपेक्षा असतात ? राज्याचा विकास कशाप्रकारे व्हावा ? हे सर्व तो जाणू इच्छितो.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये चेन्नईतील शिवाजी गणेशन मेमोरिअलच्या उद्घाटनवेळी अभिनेता कमल हसन आणि रजनीकांत एकाच व्यासपिठावर होते. यावेळी दोघांनी खूप वेळ चर्चा केली होती.
'राजकारणात कसे यशस्वी व्हायचे ?' असा प्रश्न यावेळी रजनीकांत यांनी कमलला केला होता. त्यावेळी 'माझ्यासोबत या मी तुम्हाला उत्तर देतो.' असे उत्तर त्यांनी दिले.
रजनीकांत राजकारणात येऊन आपल्याशी हातमिळवणी करणार असतील तर मला नक्कीच आवडेल असे कमल यांनी आधीच जाहीर केले होते.