Gratuity : ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? जाणून घ्या

Gratuity Calculation : ग्रॅच्युइटीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये खुप संभ्रम आहे. नेमकी ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? तसेच किती रक्कम मिळते? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत असतात. याच प्रश्नाचे उत्तर या बातमीतून जाणून घेऊयात. 

Updated: Dec 20, 2022, 04:42 PM IST
Gratuity :  ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? जाणून घ्या  title=

Gratuity Calculation : तुम्ही कोणत्याही बड्या कंपनीत काम करा, तुम्हाला ही कंपनी विविध सुविधा देत असते. यामध्ये प्रॉव्हिडंड फंड (PF) आणि ग्रॅच्युइटीचा (Gratuity) समावेश असतो. यातील ग्रॅच्युइटीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये खुप संभ्रम आहे. नेमकी ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? तसेच किती रक्कम मिळते? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत असतात. याच प्रश्नाचे उत्तर या बातमीतून जाणून घेऊयात. 

ग्रॅच्युइटीसाठी किती कालावधी गरजेचा? 

ग्रॅच्युइटी (Gratuity Calculation) कधी दिली जाते याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. बर्‍याचदा कर्मचाऱ्यांना असे वाटते की 5 वर्षे पूर्ण झाल्यावरच ग्रॅच्युइटी मिळते. मात्र तसे काही नाही आहे. तुम्ही 5 वर्षापूर्वी देखील ग्रॅच्युइटीसाठी पात्र बनू शकता.  

...तर तुम्ही पात्र ठरता?

एखाद्या कंपनीत तुम्ही 4 वर्षे 240 दिवस जरी काम केले असेल तर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी (Gratuity Calculation) पात्र ठरू शकता. हेच निकष इतर कर्मचाऱ्यांसाठी वेगळे आहेत. जसे कोळसा, खाणी किंवा भूमिगत प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्यांसाठी 4 वर्षे आणि 190 दिवसाचा कालावधी आहे. इतके दिवस पूर्ण केल्यानंतरच 5 वर्षांचा कार्यकाळ मानला जातो. 

'या' कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते? 

तसेच वरती नमूद केलेल्या वेळेनंतर तुम्ही कंपनी सोडल्यास किंवा नोकरीतून निवृत्त झालात तरीही तुम्हाला ग्रॅच्युइटी (Gratuity Calculation) मिळेल,आणि कंपनी ती नाकारू शकत नाही. तसेच नोकरीवर असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याने कंपनीत कितीही दिवस काम केले असले तरी तो ग्रॅच्युइटीचा पूर्ण हकदार आहे. 

जॉब स्विचिंगमुळे नुकसान 

आजकाल लोक झटपट जॉब स्विच (Job Switch) करतात. कंपनीतील कामाच्या वातावरणामुळे किंवा चांगल्या संधी आणि पगारासाठी कंपनी सोडतात. करीअरच्या सुरुवातीला 1-2 वर्षात जरी तुम्ही हे केले तरी तुमचे तितके नुकसान होणार नाही. परंतु, जर तुम्ही चौथ्या वर्षानंतर कंपनी सोडत असाल तर तुमचे खूप मोठे नुकसान होईल.

कशी होते कॅलक्युलेशन? 

ग्रॅच्युइटी कशी कॅलक्युलेट (Gratuity Calculation) होते, हे उदाहरणाद्वारे समजून घेऊयात.समजा तुम्ही एकाच कंपनीत 20 वर्षे काम केले आणि तुमचा शेवटचा पगार दरमहा 50,000 रुपये होता. हे तुम्हाला सूत्रात 2 संख्या देते.आता 15 आणि 26 बाकी आहेत, हे काय आहे? जेव्हा ग्रॅच्युइटीची गणना केली जाते, तेव्हा एका महिन्यात फक्त 26 दिवस मोजले जातात कारण 4 दिवसांची रजा काढून टाकली जाते. या फॉर्म्युलामध्ये, 15 म्हणजे तुम्हाला वर्षातून फक्त 15 दिवसांसाठी ग्रॅच्युइटी मिळेल. आता त्याची गणना करूया. (50,000) x (20) x (15/26) म्हणजेच, 20 वर्षांच्या सेवेनंतर, तुम्ही सुमारे 6 लाख रुपयांच्या ग्रॅच्युइटीचे (Gratuity) पात्र आहात.