Morbi Bridge accident : गुजरातमधील (Gujarat) मोरबीचा (Morbi) प्रसिद्ध 'झुलता पूल' रविवारी कोसळला (cable bridge collapses). अपघाताच्या वेळी ब्रिजवर सुमारे 500 लोक होते, अशी आकडेवारी सांगते. आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास हा केबल पूल (cable bridge) कोसळला. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, मोरबी केबल ब्रिज 5 दिवसांपूर्वी दुरुस्तीनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मोरबी (Morbi) पुलावर जाण्यासाठी लोकांकडून 17 रुपये आकारले जात होते आणि मुलांचे तिकीट 12 रुपये होते. मोरबी केबल पुलावर रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक जमले होते. दुरूस्तीनंतर पूल सुरु केला असता, तो 5 दिवसांत कसा तुटला? पुलावर इतक्या मोठ्या संख्येने लोकांना परवानगी का देण्यात आली? अशा प्रश्नांची आता एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करणार आहे.
या घटनेशी संबंधित अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. काही खोडकर लोक जाणीवपूर्वक पूल हलवत होते, हे स्पष्ट दिसत आहे. त्यांना थांबवण्यात आले, पण त्यांनी ऐकले नाही. पूल तुटण्याचे (cable bridge) हे या दुर्घटनेचे प्रमुख कारण असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की लोक आरडाओरडा करत जीव वाचवण्यासाठी नदीतून बाहेर येऊ लागले. अनेकांनी पुलाचा काही भाग पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण पुलावर जोरजोरात पाय आपटत होते. काही तरुण ब्रिजच्या केबलवर लाथ मारताना दिसत आहेत. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. दरम्यान, पोलीस या तरुणांचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
Heavy traffic before crashing machhu hanging bridge many of this people try to damage this bridge. pic.twitter.com/pmfdh5QDGl
— vijay patel (@vijaypatelMorbi) October 30, 2022
नेमकं काय झालं?
दरम्यान, गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास केबल झुलता पूल कोसळला. त्यामुळे 500 हून अधिक लोक माचू नदीत पडले. या भीषण अपघातात 132 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 50 हून अधिक मुले आणि महिला आहेत. राजकोटचे भाजप खासदार मोहन कुंडारिया यांच्या कुटुंबातील 12 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल 6 महिन्यांपासून देखभाल आणि नूतनीकरणासाठी बंद होता. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हे काम पूर्ण झाले. 25 ऑक्टोबर रोजी तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र, त्यासाठी परवानगी घेण्यात आली नाही. जखमींवर उपचारासाठी मोरबी आणि राजकोटच्या रुग्णालयात आपत्कालीन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.