मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विचित्र अपघात

मुंबई अहमदाबाद महामार्गावर एक विचित्र अपघात झालाय़. 

Updated: Jul 10, 2018, 08:18 PM IST
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विचित्र अपघात  title=

मुंबई : मुंबई अहमदाबाद महामार्गावर एक विचित्र अपघात झालाय़. एका ट्रकला ओव्हरटेक करताना भरधाव ओमनी कारचा अपघात झाला. मात्र या अपघातातत कुणाला थोडीही जखम झाली नाही. ओव्हरटेक करण्याच्या नादात ओमनी कार थेट १८० अंशाच्या कोनात ट्रकच्या समोरून विरुद्ध दिशेला आली. मात्र यातल्या चालकाला आणि बसलेल्या एका प्रवाशाला कोणतीही इजा झाली नाही. हा अपघात गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातल्या वाघलधरा जवळ महामार्गावर झालाय. ओमनीनं ट्रकला दिलेला हा चकवा एवढा वेगात होता की दृश्य पाहतानाही हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही.