मुतखड्यावर उपचार... 'फोर्टिस'चं बिल फक्त ३६ लाख रुपये!

खाजगी रुग्णालयांची बिलं सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत... याचसंबंधी आता गुरुग्रामच्या फोर्टिस हॉस्पीटलचा आणखी एक कारनामा चर्चेत आहे. 

Updated: Dec 14, 2017, 09:35 PM IST
मुतखड्यावर उपचार... 'फोर्टिस'चं बिल फक्त ३६ लाख रुपये! title=

नवी दिल्ली : खाजगी रुग्णालयांची बिलं सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत... याचसंबंधी आता गुरुग्रामच्या फोर्टिस हॉस्पीटलचा आणखी एक कारनामा चर्चेत आहे. 

एका रुग्णावर मुतखड्यासाठी उपचार केल्याचं दाखवत या हॉस्पीटलनं रुग्णाला ४२ दिवसांसाठी तब्बल ३६ लाख रुपयांचं बिलाचा चुना लावलाय. 

उल्लेखनीय म्हणजे, उपचारानंतरदेखील हा रुग्ण आत्तापर्यंत स्वत:च्या पायावर उभं राहण्यास असमर्थ ठरलाय. 

काय घडलं नेमकं?

दौलताबादचे रहिवासी असलेले भीम सिंह फोर्टिस हॉस्पीटलमध्ये १४ एमएमच्या मुतखड्याच्या उपचारासाठी दाखल झाले होते. एप्रिल २०१६ मध्ये फोर्टिसनं त्यांना आपल्या हॉस्पीटलमध्ये दाखल करून घेतलं... परंतु, या दरम्यान त्यांची किडनी खराब झाली होती. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्धांगवायूमुळे भीमसिंह यांना दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. 

या संपूर्ण उपचारात फोर्टिसनं त्यांना तब्बल ३६ लाख ६८ हजार रुपयांचं बिल सोपवलंय... याबद्दल भीम सिंह यांच्या मुलानं सीएमओमध्येही तक्रार दाखल केलीय. 

डेंग्युनं सात वर्षांच्या मुलाच्या मुलाच्या मृत्यूनंतर फोर्टिस हॉस्पीटलच्या अडचणींत वाढ होतेय... तक्रारकर्ते आता पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागत आहेत.