अत्यंत खतरनाक किडा! विषारी लिक्विड सोडून करतो शिकार; घराजवळ दिसल्यास राहा अलर्ट

आपल्या घरात अनेक प्रकारचे कीटक दिसतात. अनेकवेळा घरात सापासारखा धोकादायक प्राणी येतो.अशाच एका धोकादायक प्राण्याबद्दल सांगणार आहोत, 

Updated: Jan 15, 2022, 09:52 AM IST
अत्यंत खतरनाक किडा! विषारी लिक्विड सोडून करतो शिकार; घराजवळ दिसल्यास राहा अलर्ट  title=

मुंबई : आपल्या घरात अनेक प्रकारचे कीटक  दिसतात. अनेकवेळा घरात सापासारखा धोकादायक प्राणी येतो. अशाच एका धोकादायक प्राण्याबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, तो इतका धोकादायक आहे की त्याला पाहताच आपण सावध व्हायला हवे. हॅमरहेड वर्म असे या प्राण्याचे नाव आहे. तो कीटक वर्गात मोडला जातो.

डोके हातोड्यासारखे

या किड्याचे नाव हॅमरहेड आहे. कारण त्याच्या डोक्याचा आकार हातोड्यासारखा असतो. त्यामुळे या किड्याचे नाव हॅमरहेड वर्म असे नाव देण्यात आले आहे. हा किडा अमेरिका आणि युरोपमध्ये आढळतो, अनेकदा जगाच्या इतर भागातसुद्धा हा किडा आढळून आला आहे. गांडुळे या किड्याचा मुख्य आहार आहे.

गांडुळांमुळे आपली झाडे खूप वेगाने वाढतात. त्यामुळे आपण आपल्या घराजवळील रोपं, झुडपांसाठी गांडुळं मातीत सोडत असतो. हॅमरहेड्स या किड्याला गांडुळांचे खाद्य आवडते. त्यामुळे आपल्या परिसंस्थेला धोका निर्माण होतो.

हॅमरहेड्स अशा प्रकारे करतात गांडुळांची शिकार 

तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हॅमरहेड वर्म्स त्यांच्या शिकारीला लिक्विड बनवतात आणि ते पितात.  ते गांडुळांच्या जवळ चिकट द्रव सोडतात. हे लिक्विड टेट्रोडोटॉक्सिन नावाचे रसायन म्हणून ओळखले जाते. जेव्हा हॅमरहेड हे रसायन सोडतात तेव्हा गांडुळे त्यांना चिकटतात. यानंतर हॅमरहेड त्यांची शिकार पकडतात.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हॅमरहेड्स जर आपल्या परिसंस्थेसाठी महत्वाच्या असलेल्या गांडुळांची शिकार करत राहिले तर त्याचा आपल्या पर्यावरणावर वाईट परिणाम होईल.