शेतातील हनुमानाची मूर्तीशी छेडछाड

हनुमानाच्या मूर्तीशी छेडछाड केली आहे. तसेच एक पोस्टरही तेथे चिपकवण्यात आलं आहे.

Updated: Mar 9, 2018, 12:57 AM IST
शेतातील हनुमानाची मूर्तीशी छेडछाड

बलिया : देशभरातील काही महापुरूषांच्या पुतळ्याची छेडछाड करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत,  तर उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील खरूआव गावातही काही समाजकंटकांनी हनुमानाच्या मूर्तीशी छेडछाड केली आहे. तसेच एक पोस्टरही तेथे चिपकवण्यात आलं आहे.

२० वर्षाआधी सुरेश सिंहच्या खेतात करंट लागून एका माकडाचा मृत्यू झाला होता, लोकांनी शेतात माकडाचे अंत्यसंस्कार केले, आणि हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली. आता झालेल्या छेडछाडीची पोलीस चौकशी करत आहेत.

देशात अनेक ठिकाणी पुतळ्यांची छेडछाड होत आहे, तेव्हा यावर लोकांनी शांतता ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे, कारण यातून वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.