दारुबंदी कायदा तोडल्याप्रकरणी एक लाखांहून अधिक बेवड्यांना अटक

दारुबंदी कायदा तोडल्याप्रकरणी एक-दोन नाही तर तब्बल लाखो बेवड्यांना अटक करण्यात आली आहे. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 8, 2018, 11:42 PM IST
दारुबंदी कायदा तोडल्याप्रकरणी एक लाखांहून अधिक बेवड्यांना अटक
File Photo

नवी दिल्ली : दारुबंदी कायदा तोडल्याप्रकरणी एक-दोन नाही तर तब्बल लाखो बेवड्यांना अटक करण्यात आली आहे. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरं आहे.

बिहारमध्ये १ एप्रिल २०१६ पासून पूर्णपणे दारुबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर यासंदर्भात बनवण्यात आलेले नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होण्यास सुरुवात झाली.

एक लाखांहून अधिक अटकेत

बिहारमध्ये दारूबंदी कायदा २०१६ अंतर्गत दारू विक्रीस बंदी घालण्यात आली. या कायद्यातंर्गत जर एखाद्याच्या घरी मद्य मिळाले तर त्याला अटक करण्याची तरतूद आहे. अशाच प्रकारे कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी एक लाखांहून अधिक बेवड्यांना अटक करण्यात आली आहे.

१,२१,५४२ नागरिकांची कारागृहात रवानगी

विधानपरिषदेमध्ये भाजप आमदार दिलीप जैसवाल यांच्याद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री बिजेंद्र प्रसाद यादव यांनी सांगितले की, आतापर्यंत एक लाख २१ हजार ५८६ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक लाख २१ हजार ५४२ नागरिकांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

लाखो रुपयांचाी दारु जप्त

दारुबंदी झाल्यापासून सहा मार्चपर्यंत जवळपास ६.५ लाख छापे टाकण्यात आले आहेत. तर, दोन लाखांहून अधिक अवैध दारु जप्त करण्यात आली. या दरम्यान, १६.४ लाख लीटर अवैध विदेशी दारू आणि ८.२३ लाख लीटर देेशी दारु जप्त करण्यात आली आहे.