मुंबई : सामान्य माणसाला नवीन वर्षाचं गिफ्ट देण्याचा विचार सरकारने केला आहे. 1 जानेवारी रोजी सिनेमाचं तिकिट, 32 इंचाची टिव्ही आणि मॉनिटर स्क्रीनसोबत 23 वस्तू आणि जीएसटी दर कमी झाल्याने अधिसूचना जाहिर केली आहे.
जीएसटी परिषदने 22 डिसेंबर रोजी एक मुंबईत झालेल्या एका बैठकीत 23 वस्तू आणि सेवाकर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामध्ये सिनेमा तिकिट, टिव्ही, मॉनिटर स्क्रिन आणि पावर बँकचा समावेश आहे. तसेच काही भाज्यांचा दर देखील कमी करण्यात आला आहे.
ग्राहकांना या वस्तूंसाठी कमी पैसे मोजावे लागणार आहे. 1 जानेवारीपासून या वस्तूंवरील जीएसटी कमी होणार आहे. यामुळे सर्व वस्तूंचे दर घटणार आहे.
जीएसटीच्या त्या बैठकीत या वस्तूंवरील 28 टक्के दर कमी होणार आहे. काही वस्तूंचा दर 18 टक्के कमी होणार असून तर काही वस्तूंवर 12 टक्के दर कमी होणार आहे. यामुळे ग्राहकांना नवीन वर्षाचं सरकारकडून गिफ्ट मिळाल्याचं म्हटलं जात आहे.
वस्तू |
अगोदरचा GST दर |
आताचा GST दर |
LED TV 32 पर्यंत |
28 |
18 |
बिलियडर्स |
28 |
18 |
फ्रोजन भाज्या |
5 |
0 |
व्हील चेअर |
28 |
5 |
म्युझिक बुक |
5 |
0 |
रेडिअल टायर |
28 |
18 |
लिथियम बॅटरी |
28 |
18 |
100 रुपयांपर्यंत सिनेमा तिकिट |
18 |
12 |
धार्मिक विमान प्रवास |
18 |
12 आणि 5 |
थर्ड पार्टी मोटर इंश्युरन्स |
18 |
12 |