ही तर भाजपची जुनी खेळी, एक्झिट पोलवर हार्दिकची प्रतिक्रिया

गुजरात निवडणूक २०१७ साठी आज मतदान पार पडल्यानंतर अनेक 'एक्झिट पोल' जाहीर झाले. या बहुतेक एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीवर नव्हे बहुमत घेणार असल्याचं दिसतंय. 

Updated: Dec 14, 2017, 08:50 PM IST
ही तर भाजपची जुनी खेळी, एक्झिट पोलवर हार्दिकची प्रतिक्रिया  title=

अहमदाबाद : गुजरात निवडणूक २०१७ साठी आज मतदान पार पडल्यानंतर अनेक 'एक्झिट पोल' जाहीर झाले. या बहुतेक एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीवर नव्हे बहुमत घेणार असल्याचं दिसतंय. 

परंतु, गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना मात्र ही गोष्ट रुचलेली - पटलेली नाही. भाजप बहुमत घेणार असल्याचं माध्यमांमध्ये जाणून-बुजून दाखवण्यात येत आहे. ईव्हीएममधला घोळ लपवण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय, असं हार्दिक पटेल यांनी म्हटलंय. 

एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय दाखवला जात असेल तर ईव्हीएमवर कुणीही शंका उपस्थित करणार नाही... ही भाजपची जुनी खेळ असल्याचं पटेल यांनी म्हटलंय.

'इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया'चा एक्झिट पोल

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये पुन्हा भाजपचं कमळ फुलणार असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत भाजपला ९९ ते ११३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, काँग्रेसला ६८ ते ८२ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

ABP न्यूज-CSDSचा एक्झिट पोल

ABP न्यूज-CSDSच्या एक्झिट पोलनुसार सौराष्ट्र, दक्षिण गुजरात, उत्तर गुजरात आणि कच्छमध्ये भाजपला अधिक जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. ABP न्यूज-CSDSच्या एक्झिट पोलनुसार १८२ जागांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला ११७ जागा, काँग्रेसला ६४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

'इंडिया टीव्ही-व्हीएमआर'चा एक्झिट पोल

इंडिया टीव्ही-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला १०९ जागा काँग्रेसला ७० जागा तर इतरांना ३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

'न्यूज२४-टुडेज चाणक्य'चा एक्झिट पोल

तर न्यूज२४-टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजपला १३५ जागा, काँग्रेसला ४७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे