मुंबई : उत्तरप्रदेशातल्या हाथरसमधल्या तरूणीवर झालेल्या पाशवी अत्याचाराच्या निषेधात काल देशभर आक्रोश सुरू होता. हाथरसच्या भयानक घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असताना, केंद्रात सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्रिपद भूषवणाऱ्या आठवले यांना त्यावर एक अवाक्षर काढले नाही. त्यामुळे पँथरच्या लढाऊपणाचा इतिहास सांगणारे आठवले गप्प का होते, असा सवाल विचारण्यात येत आहे.
Members of the community of #Hathras gang-rape victim, protest in the city demanding justice for her. The protesters also raised slogans against Police and local administration. pic.twitter.com/b3lIz9saMo
— ANI UP (@ANINewsUP) September 30, 2020
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी युपीच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. तर बलात्काऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली. पिडितेच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्यता द्यावी तसंच हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी विनंती त्यांनी केली.
हाथरस पीडिता अत्याचार प्रकरणाची पंतप्रधानांकडून गंभीर दखल ।चौकशीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून एस आय टी स्थापन । तर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांची पुनरावृत्ती टाळायला कठोर कायदे हवेत । खासदार संजय राऊत यांची मागणी @ashish_jadhaohttps://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/t19PBYa5qg
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 30, 2020
दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलेली अभिनेत्री पायल घोषला घेऊन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले काल राजभवनवर गेले. पण उत्तरप्रदेशातल्या हाथरसमधल्या तरूणीवर झालेल्या पाशवी अत्याचाराच्या निषेधात काल देशभर आक्रोश सुरू होता. हाथरसच्या भयानक घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असताना, केंद्रात सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्रिपद भूषवणाऱ्या आठवले यांना त्यावर एक अक्षर काढावसे वाटले नाही. हाथरस प्रकरणी संतापाची लाट देशात असताना, पँथरच्या लढाऊपणाचा इतिहास सांगणारे आठवले गप्प का होते. आठवलेंची उपेक्षितांबाबतची कळकळ कुठे गेली. अखेर रात्री उशिराने आठवले यांना हाथरसच्या पीडितेची आठवण झाली का, असे सवाल आता केले जात आहेत.