सोशल मीडियातील ओळखीतून प्रेम; रात्रीच्या अंधारात पळवून नेले, सकाळी प्रेयसीचा चेहरा पाहिला आणि...

Hathras Love Story: एका मुलीने तिचा चेहरा बदलून इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट तयार केले होते.

Pravin Dabholkar | Updated: Dec 11, 2023, 10:30 AM IST
सोशल मीडियातील ओळखीतून प्रेम; रात्रीच्या अंधारात पळवून नेले, सकाळी प्रेयसीचा चेहरा पाहिला आणि... title=

Hathras Love Story: सोशल मीडियामुळे जग खूपच जवळ आले आहे. प्रेम, नाते घट्ट व्हायला खूप वेळ लागतो पण आजकाल सोशल मीडियामुळे सर्वच गोष्टी वेगाने होऊ लागल्या आहेत. तरुणांना सोशल मीडियातील फोटो पाहून एकमेकांवर प्रेम होते. प्रेम निभवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. पण पुढे त्यांना पश्चातापाची वेळ येते. अशीच एक घटना समोर आली आहे. सोशल मीडियात ओळख झालेली तरुणी प्रत्यक्षात दिसल्यावर तरुणाच्या मनात काय भावना आल्या? पुढे काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

एका तरुणाची एका तरुणीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आयुष्याच्या आणाभाका घेतल्या. एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचे ठरवले. प्रत्यक्षात तो दिवस आला. त्या दिवशी त्यांचे वेगळ्या जगात राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. 

हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणीला घरातून पळवून न्यावे लागणार होते. प्रियकर सज्ज होता. रात्रीचा अंधार गडद होत चालला होता. समोर आलेल्या एखाद्याचा चेहरा दिसेल इतका प्रकाशही नव्हता. ठरल्याप्रमाणे ठरलेल्याजागी प्रेयसी आली. आणि तरुणी प्रियकरासह घरातून पळून गेली. इकडे गावात पोबारा झाला. मुलगी कुठे गेली म्हणून शोधाशोध सुरु झाली. पण तिकडे प्रियकर-प्रेयसीसोबत काहीतरी वेगळंच घडणार होतं. प्रियकराने अर्ध्या वाटेत मुलीचा चेहरा पाहिल्या आणि त्याला मोठा धक्का बसला. त्याचा प्रेमाचा आवेश एका क्षणात निघून गेला. आपण सोशल मीडियात पाहिलेला चेहरा आणि प्रत्यक्षात पाहिलेली तरुणी यावर त्याला विश्वास बसत नव्हता.  आता प्रेम तर संपल होतं. पुढे काय करायच? याचा विचार तरुण प्रियकराने केला आणि प्रेयसीला तिच्या घरी पाठवण्याचा निर्णय त्याने घेतला. तरुणाने प्रेयसीला पोलिसांच्या ताब्यात दिले.यानंतर  सादाबाद पोलिसांनी दोघांनाही सोबत घेतले.

हातरसच्या सादाबाद पोलीस स्टेशन परिसरातील एका मुलीने तिचा चेहरा बदलून इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट तयार केले होते. दिल्लीतील पटेल नगर येथे राहणाऱ्या एका तरुणाशी तिची मैत्री झाली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली आणि एकमेकांसाठी राहण्याचे वचन दिले. प्रेमाच्या आवेशात तरुणीने प्रियकरासह घरातून पळून जाण्याचे मान्य केले. शनिवारी प्रियकर दिल्लीहून सादाबादला पोहोचले. संधी साधून तरुणीही घरातून पळून प्रियकराकडे आली. रात्री दोघेही रस्ता चुकले आणि मांटजवळ पोहोचले. तोपर्यंत सकाळ झाली होती. उजेडात प्रेयसीचा चेहरा पाहून तो हैराण झाला. इंटरनेट मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोपेक्षा मुलीचा चेहरा पूर्णपणे वेगळा असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी दुपारी प्रियकराने सुरीर पोलीस ठाणे गाठले. तरुणी त्याच्यासोबत पळून गेल्याचे पोलिसांना सांगितले. हे ऐकून पोलिसांनाही आश्चर्य वाटले. यानंतर मुलीला तिच्या घरी पाठवण्यात आले. 

पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली. यावेळी आपण तरुणीसोबत कोणतेही चुकीचे काम केले नसल्याचे तरुणाने सांगितले. सुरीर पोलिसांच्या माहितीवरून सादाबाद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश कुमार यांनी दोघांनाही सोबत घेतले. दोघांना सादाबाद पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती  प्रभारी निरीक्षक प्रमेंद्र कुमार यांनी दिली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x