एचडी देवेगौडांच्या मुलाकडून भाजपावर गंभीर आरोप

देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या मुलाने भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

Updated: May 16, 2018, 01:23 PM IST
एचडी देवेगौडांच्या मुलाकडून भाजपावर गंभीर आरोप title=

बंगळुरू : देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या मुलाने भाजपावर गंभीर आरोप केला आहे, तर काँग्रेसनेही भाजपा सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. एचडी देवेगौडा यांचा मुलगा रेवण्णाने भाजपाकडून जेडीएसच्या आमदारांना १०० कोटी रूपये, तसेच मंत्रिपदाची ऑफर दिली जात असल्याचं सांगत, भाजपाकडून घोडेबाजार केला जात असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे काँग्रसने म्हटलं आहे, जर भाजपाने सत्तेचा गैरवापर करत, राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापन करण्याचं आमंत्रण दिलं तर आम्ही न्यायालयाचे दार ठोठवू.

एकंदरीत बंगळुरूत विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी देखील सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि जेडीएसमध्ये सत्ता संघर्ष सुरूच आहे, दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की, जेडीएसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न देखील भाजपाकडून सुरू आहे. यात रेवण्णा यांनी केलेला आरोप हा अतिशय गंभीर आहे.