SBI Har Ghar Lakhpati Scheme : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अशी ओळख असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वचतीनं ग्राहकांसाठी आणखी एक नवी योजना सादर करण्यात आली आहे. 'हर घर लाखपति' (Har Ghar Lakhpati) असं या योजनेचं नाव असून, ही एक रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना आहे. सोप्या भाषेत सांगावं तर, लहान गुंतवणुकीसह या योजनेअंतर्गत मोठी रक्कम जमा केली जाऊ शकते. बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना मिळणारा फायदा तुलनेनं जास्त आहे.
दर महिन्याला ठराविक रक्कम 'हर घर लाखपति' योजनेमध्ये गुंतवत एक मोठी रक्कम मिळवण्याच्या हेतूनं Saving करणाऱ्यांसाठी ही योजना बरीच मदतीची सिद्ध होणार आहे. या योजनेचा मॅच्योरिटी पीरियड 3 ते 10 वर्षे इका असून, यामध्ये 3 ते 10 वर्षांसाठी गुंतवणूक करता येऊ शकते. मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या इतर गरजा भागवण्यासाठी म्हणून या रकमेचा वापर केला जाऊ शकतो.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी ज्येष्ठांपर्यंत या योजनेमध्ये गुंतवणूक करता येते. लहान मुलांचं वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक असलं तरीही या योजनेत गुंतवणूक केली जाऊ शकते. अर्थात हे खातं मुलाचे/ मुलीचे आईवडील किंवा कायदेशीर अभिभावक सुरू करू शकतात. या योजनेअंतर्गत मिळणारं व्याज हे मॅच्योरिटी पिरियडच्या हिशोबानं वेगवेगळं असून, या गुंतवणुकीसाठी सर्वसामान्य गुंतवणूकदाराला 6.75 टक्के व्याज दिला जातो. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25 टक्के इतकं व्याज दिलं जातं. एखाद्या एसबीआय कर्मचाऱ्यानं या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यास त्यावर 8 टक्के व्याज दिलं जातं.
एखाद्या महिन्यात जर या योजनेअंतर्गत भरला जाणारा हफ्ता चुकला, तर ग्राहकांना 100 रुपयांवर 1.50 रुपयांपासून 2 रुपये इतकी लेटफीस आकारली जाते. एखाद्या गुंतवणुकदारानं सलग 6 हफ्त्यांची रक्कम भरली नाही तर, मात्र या ग्राहकाचं खातं बंद केलं जाईल आणि या खात्यातील रक्कम खातेधारकाच्या Saving Account मध्ये ट्रान्सफर केली जाईल.