चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

 पी चिदंबरम यांच्यासंदर्भातील जामीन संदर्भतील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी 

Updated: Aug 21, 2019, 06:29 PM IST
चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम title=

नवी दिल्ली : माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयातून आज कोणताही दिलासा न मिळाल्याने त्यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. पी चिदंबरम यांच्यासंदर्भातील जामीन संदर्भतील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. 

माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या घराबाहेर सीबीआयने नोटीस लावली आहे. त्यांच्यावर फसवणूकीचे कलम ४२० लावण्यात आले आहे. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती जंटलमन चिदंबरम ‘मिस्टर ४२०’ बनल्याची. सीबीआयने चिदंबरम यांच्या घराबाहेरच्या गेटवर नोटीस लावली आहे. त्यात फसवणूक आणि विश्वासघात केल्याचे भारतीय दंड संविधानचे कलम ४२० लावले आहे.

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेल्या पी. चिदंबरम यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अटक थांबवावी अशी याचिका चिदंबरम यांनी केली होती त्यावर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. न्या. एन. व्ही. रमणा यांच्या न्यायालयासमोर आज ही याचिका सुनावणीसाठी आली होती. मात्र, न्या. रमणा यांनी या प्रकरणावर निर्णय देण्यास नकार देत आधी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर याबाबत दाद मागावी असा सल्ला चिदंबरम यांच्या वकिलांना दिला. मात्र, चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी तोपर्यंत दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती तरी द्यावी अशी विनंती कोर्टाला केली. मात्र, न्या. रामणा यांनी यालाही नकार दिला.