'आधार' कायद्यावर आज होणार सुनावणी

आधार कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल झाली असून त्यावर तातडीनं सुनावणी करण्याची मागणी होत आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 3, 2017, 03:44 PM IST
'आधार' कायद्यावर आज होणार सुनावणी  title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज आधार कायद्याच्या वैधतेबाबत दाखल याचिकांवर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती चेल्लमेश्वर यांच खंडपीठ या याचिकेवर सुनावणी करणार आहेत. 

कर्नाटकचे निवासी मॅथ्यू थॉमस यांनी आधार कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली असून त्यावर तातडीनं सुनावणी करण्याची मागणी केली. आधार कायद्यामुळे घटनेनं दिलेल्या खाजगी आयुष्याच्या अधिकाराची पायमल्ली होते. तसेच आधारसाठी वापरण्यात येणारे बायोमॅट्रिक तंत्रज्ञानही सदोष आहे असा याचिकाकर्त्याचा दावा आहे. 

३० ऑक्टोबरला सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आधार कायद्याविषयी घटनापिठाची स्थापना करून नोव्हेंबर महिन्यात सुनावणी करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. याआधी मोबाईल नंबर आणि बँक खात्यांशी आधार नंबर जोडणे घटनाबाह्य असल्याच्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात आधीच दाखल करण्यात आल्या आहेत. 

मोबाईल नंबर आधारशी जोडला का ?

 मोबाईल नंबर आधारशी जोडण्याची अंतिम तारीख ३० मार्च २०१८ ऐवजी ६ फ्रेबुवारी करण्यात आली आहे. तर नव्या बँक खात्यासाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आलाय. याविषयीच प्रतिज्ञापत्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे.