हेल्मेटनं वाचवला चिमुकल्याच्या बापाचा जीव, पाहा थरारक व्हिडीओ

तुम्ही जर हेल्मेट घालणं टाळत असाल तर चूक करताय, कारण हेल्मेटमुळेच या चिमुकल्याच्या बापाचा जीव वाचला, पाहा अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ

Updated: Sep 17, 2021, 09:20 PM IST
हेल्मेटनं वाचवला चिमुकल्याच्या बापाचा जीव, पाहा थरारक व्हिडीओ

वडोदरा: बऱ्याचदा हेल्मेट घालण्याचा आळस असतो. पण एक हेल्मेट जीव वाचवतं हे वारंवार आवाहन करूनही अनेकजण त्याकडे कानाडोळा करतात. मात्र एका हेल्मेटमुळे व्यक्तीचा जीव वाचल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अंगावर काटा आणणारा अपघात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर समजतं की चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट खरंच आपला जीव वाचवू शकतं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुटुंब नवरा-बायको आणि त्यांचा चिमुकला मुलगा बाईकवरून चालले आहेत. वाटेत खड्डा येतो म्हणून तो चुकवण्याचा प्रयत्न असतो. त्याचवेळी समोरून ट्रॅक्टर येतो. या सगळ्यात तरुणाचा बाईकवरील नियंत्रण सुटतं आणि भीषण अपघात होतो. बाईकस्वार ट्रॅक्टरखाली आला. त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टर गेला. 

या तरुणाचा जीव हेम्लेट घातल्यामुळे वाचला आहे. या व्हिडीओमध्ये ते स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. सुदैवानं चिमुकला ट्रॅक्टरखाली आला नाही त्यामुळे अनर्थ टळला. दुचाकीवर सर्वात मोठं सुरक्षा कवच असलेलं हेल्मेट हे घालण्याचा आळस करू नका. 

हा अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ गुजरातमधील वडोदरा इथला असल्याची माहिती मिळाली आहे. बाईक चालवताना तुम्ही जर हेल्मेट घालत नसाल तर आताच घालायला सुरु करा. कारण त्यामुळेच आज या चिमुकल्याच्या वडिलांचा जीव वाचला आहे.