२०१८ मध्ये या दिवशी सर्वाधिक लोकांनी पाहिला टीव्हीवरचा हा कार्यक्रम

या दिवशी देशातील सर्वाधिक लोकं टीव्ही समोर बसले होते

Updated: Dec 30, 2018, 02:13 PM IST
२०१८ मध्ये या दिवशी सर्वाधिक लोकांनी पाहिला टीव्हीवरचा हा कार्यक्रम title=

नवी दिल्ली : तुम्हाला माहित आहे का २०१८ मध्ये कोणत्या दिवशी सर्वाधित लोकांनी टीव्ही पाहिली.? आमिर खान किंवा सलमान खानच्या टीव्ही शो नाही, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना ही नाही. तर तो दिवस आहे भारताचा स्वातंत्र्य दिन. १५ ऑगस्ट २०१८ ला सर्वाधिक लोकांनी टीव्ही पाहिली. प्रेक्षकांची संख्या आणि चॅनल रेटिंग सांगणारी संस्था बार्क (BARC) ने म्हटलं की, स्वतंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सर्वाधिक लोकांनी पाहिलं. यामुळे या दिवशी सर्वाधिक टीव्ही व्हिवरशिप मिळाली. १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्य़ावरुन झेंडा फडकवला आणि देशाला संबोधित केलं. पंतप्रधानांचं या दिवसाचं भाषण सर्वाधिक लोकांनी पाहिलं.

बीएआरसीने ट्विट करत माहिती दिली आहे की, '#Recap2018 मध्ये सर्वाधिक टीव्ही व्हिवरशिपने १५ ऑगस्टला रेकॉर्ड ब्रेक केला. कारण देशभक्त नागरिकांनी थेट प्रक्षेपण आणि विशेष कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्ही सुरु केला.#YearinReview.' 

बीएआरसीने म्हटलं की, देशातील एकूण पाहिल्या जाणाऱ्या व्हिडिओमध्ये ९३ टक्के भाग टीव्हीचा आहे. आणि यामुळे दुसऱ्या माध्यमांपेक्षा टीव्ही म्हणून पुढे आहे. बीएआरसी इंडियाचे सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी बिजनेस स्टँडर्डच्या एका लेखमध्ये म्हटलं की, बीएआरसी देशातील ८३.६ कोटी टीव्ही प्रेक्षकांचं आकलन करते. प्रेक्षकांची आवड झपाट्याने बदलत आहे. २०१८ मध्ये देशातील मार्केटिंग आणि इंटरटेनमेंटमध्ये सर्वाधिक खर्चाचा ४२ टक्के खर्च टीव्हीवर होतो.

त्यांनी म्हटलं की, यावर्षी देशात एचडी चॅनेलची संख्या ७८ वरुन ९२ झाली आहे. यावरुन असं दिसतं की, लोकांना चांगली क्वॉलिटी हवी आहे. इंटरनेट आणि मोबाईलचा झपाट्याने वापर होत असला तरी आजही ९३ टक्के व्हिडिओ टीव्हीच्या माध्यमातून पाहिले जातात. २०१८ मध्ये कर्नाटक निवडणूक, श्रीदेवी यांचा मृत्यू, स्वतंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी सर्वाधिक न्यूज चॅनेल पाहिले गेले.