Himachal Pradesh : देवभूमी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशात पुन्हा निसर्गानं हाहाकार माजवला आहे. सोमवारी सकाळी येथील शिमला शहरात एक मोठी भूस्खलनाची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शिमल्यातील शिव बौड़ी मंदिर येथे हे भूस्खलन झालं असून, प्राथमिक स्तरावर ढिगाऱ्याखाली 35 ते 40 डण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाल्यची माहिती प्रशासनानं दिली असून, यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
#WATCH | Nahan, Himachal Pradesh: Several vehicles & castles washed away due to heavy rainfall in Sirmaur district.
(Video source: District Disaster Management Authority) pic.twitter.com/DlNZ1zIC3B
— ANI (@ANI) August 13, 2023
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास हिमाचलमध्ये भूस्खलनाची ही घटना घडली. भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या सुरु असणाऱ्या सावन महिन्यातील सोमवारच्या निमित्तानं इथं अनेक भाविक मंदिरात पुजेसाठी पोहोचले होते. यादरम्यानच भूस्खलन झाल्यामुळं अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून इथं भूस्खलनाच्या घटना घडल्या होत्या. पण, तरीही त्याची गांभीर्यानं दखल घेतली गेली नसल्याचा नकारात्मक सूर स्थानिकांनी आळवत एकच आक्रोश केला.
इथे हिमाचलमध्ये भूस्खलनाच्या घटना वाढत असतानाच तिथे सोलनमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती आहे. सोलन जिल्ह्याती कंडाघाटमधील जादो गावात रविवारी रात्री उशिरा ढगफुटीसदृश घटना घडल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये दोन घरं आणि एक गोशाळा वाहून गेल्याची अंगाचा थरकाप उडवण्याची माहिती समोर आली आहे. सोलन येथील ढगफुटीनं आतापर्यंत सातजणांचा बळी घेतल्याची माहिती मिळाली आहे.
हिमाचलमध्ये पावसामुळं माजलेला हाहाकार पाहता पुढील काही महिने इथं पर्यटनावर या संकटाचा थेट परिणाम होताना दिसणार आहे. रस्तेमार्गानं देशातील बहुतांश भाग जोडले गेल्यामुळं वर्षातील बाराही महिने बऱ्याच पर्यटकांचा ओघ हिमाचलकडे पाहायला मिळाला होता. आता मात्र तिथं सुरु असणारं पावसाचं थैमान पाहता अनेकांनीच आपले बेत रद्द केले आहेत. किंबहुना स्थानिक प्रशासनानंच पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ज्यामुळं या राज्यातील पर्यटनावर आणि अर्थव्यवस्थेवरही या साऱ्याचा परिणाम दिसून येणार आहे.