घाटातील Traffic टाळण्यासाठी त्याने थेट नदीत घातली कार; अन् नंतर...; पाहा Video

Himachal Pradesh Video Driving Thar In River: एएनआय या वृत्तसंस्थेनं हा व्हिडीओ शेअर केला असून बाजूलाच असलेल्या घाटरस्त्यावरुन अन्य पर्यटकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 26, 2023, 09:15 AM IST
घाटातील Traffic टाळण्यासाठी त्याने थेट नदीत घातली कार; अन् नंतर...; पाहा Video title=
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

Himachal Pradesh Video Driving Thar In River: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी हिमाचल प्रदेशकडे धाव घेतल्याचं चित्र दिसत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. हिमाचलमधील अनेक अरुंद रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हिमाचलमध्ये वाहतुकीचा बोजवारा उढालेला आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असल्याने अनेकजण अडकून पडले आहेत. मात्र या गर्दीतून वाट काढण्यासाठी एका अती हुशार वाहन चालकाने चक्क नदीमध्ये आपली थार गाडी टाकली. त्यानंतर हे काही घडलं तो थरार कॅमेरात कैद झाला आहे.

नदीतून चालवली कार

लाहौल खोऱ्यातील चंद्रा नदीच्या पत्रातून आपली महिंद्रा थार एसयुव्ही कार चालवणाऱ्या एका चालकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नशीबाने या नदीच्या पाण्याचा प्रवाह फारच संथ होता आणि पात्र उथळ होते. पाण्याचा वेग वाढला असता तरी ही गाडी खेळण्यातील गाड्यांप्रमाणे वाहून गेली असती. हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेबरोबरच अनेकांनी सोशल मीडीयीवरुन शेअर केले आहे.

पर्यटकांनी शूट केला व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये अगदी नदी पात्रातून ही व्यक्ती आपली थार गाडी चालवताना दिसत आहे. उथळ जागेचा अंदाज घेत गाडी वाहून जाणार नाही या खबरदारीसहीत ही व्यक्ती गुडघाभर पाहण्यातून कार चालवताना दिसते. समोरच्या डोंगरावरील घाट रस्त्यावरुन या कारचा थरारक प्रवास अन्य पर्यटकांनी कॅमेरात कैद केला आहे. 

पोलिसांनी ठोठावला दंड

पोलिसांनी या एसयुव्ही चालकाला दंड ठोठावला आहे. पोलिस निरिक्षक मयंक चौधरी यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. "लाहौल स्पिती जिल्ह्यातील चंद्रा नदीमधून कार चालवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल झाला होता. मोटर व्हेइकल कायदा 1988 अंतर्गत या चालकाला दंड ठोठावण्यात आला आहे. अशाप्रकारचा गुन्हा भविष्यात परत कोणी करु नये यासाठी कठोर शासन करण्यात आलं आहे. आता या ठिकाणी जिल्हा पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे," असं मयंक यांनी सांगितलं. 

3 दिवसांमध्ये 55 हजार गाड्या

लाहौल आणि मनालीला जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. त्याचवेळेस एका चालकने आपली गाडी थेट नदीपात्रात घातली. मागील 3 दिवसांमध्ये रोहतांगमधील अटल बोगद्यामधून तब्बल 55 हजार गाड्या गेल्या आहेत. या मार्गावरील वाहतूक कोंडीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत.