Holi Celebration: आज संपूर्ण देशभरात होळीचा (Holi) उत्साह आहे. आपले मित्र, कुटुंबीय आणि नातेवाईकांसह प्रत्येकजण होळी साजरी करत आहे. रंगांची उधळण करत होळी सण साजरा होत असताना जोडीला चविष्ट खाण्याची मेजवानीही असते. अनेकजण घरांमध्ये पुरणपोळीचं गोड जेवणाची मजा घेत असताना, काहीजण बाहेर मित्रांसह सण साजरा करत आहेत. अनेकांना होळीत भांग (Bhaang) प्यायला आवडते. आता होळीत भांग प्यायला मिळावी यासाठी अनेकजण थेट झोमॅटोवरच (Zomato) ऑर्डर देत आहेत. पण झोमॅटोनेही यावर ट्वीट (Tweet) केलं असून, यानंतर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
होळी म्हणजे रंगांची उधळण, गोड मिठाई, पुरणपोळीचं जेवणं, मित्र आणि कुटुंबासह सेलिब्रेशन असतं. या होळीत अनेकांना भांग प्यायलाही आवडतं. याच पार्श्वभूमीवर आज अनेकजण थेट 'झोमॅटो'वरुन भांगसाठी ऑर्डर देत आहेत. शुभम नावाच्या एका तरुणाने तर तब्बल 14 वेळा झोमॅटोला फोन करुन भांगची मागणी केली. यानंतर झोमॅटोने अखेर ट्वीट करत आपण भांगची डिलिव्हरी करत नसल्याचं सांगितलं आहे.
someone please tell shubham from gurgaon we don't deliver bhaang ki goli. he has asked us 14 times
— zomato (@zomato) March 7, 2023
'गुडगावमधील शुभमला कोणीतरी आम्ही भांगची गोळी डिलिव्हर करत नाही सांगा. त्याने 14 वेळा फोन केला आहे,' असं ट्वीट झोमॅटोने केलं. यानंतर या ट्वीटवर कमेंट्सचा पाऊस सुरु झाला. अनेकांनी यावर उपहासात्मक तसंच खिल्ली उडवणारे ट्वीट केले.
Zomato, iske saath MOU sign karo. @deepigoyal
Location - https://t.co/tca7smmbgW pic.twitter.com/xPrnD55taQ— Reporter (Bollywood & Politics) (@TweetAbhishekA) March 7, 2023
Rohit sitting in Bangalore got a startup idea from your tweet.
— Rohan Agarwal (@iamrohanagarwal) March 7, 2023
We all are shubham on holi
— vodka+cranberry (@Vermajikibatein) March 7, 2023
विशेष म्हणजे या ट्विटने दिल्ली पोलिसांचंही लक्ष वेधून घेतलं. दिल्ली पोलिसांनी या ट्वीटरवर भन्नाट उत्तर दिलं.
If anyone meets Shubham.... tell him not to drive if he consumes Bhaang. https://t.co/r94hxt5jeL
— Delhi Police (@DelhiPolice) March 7, 2023
झोमॅटोच्या ट्वीटवर व्यक्त होताना दिल्ली पोलिसांनी 'जर कोणाला शुभम भेटला, तर भांग पिऊन गाडी चालवू नको सांगा,' असं भन्नाट उत्तर दिलं आहे.