Home Loan | होम लोन रिफायनान्सिंग म्हणजे काय? व्याजही कमी आणि बचत होईल मोठी

होम लोनचा अधिकचा EMI कसा कमी कराल? सोबत लाखोंची होईल बचत. वाचा 

Updated: Jul 7, 2021, 09:13 PM IST
Home Loan | होम लोन रिफायनान्सिंग म्हणजे काय? व्याजही कमी आणि बचत होईल मोठी title=

मुंबई : आर्थिक वर्ष 2021 मध्ये होम लोनचे व्याज सर्वात कमी असल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबर 2019 नंतर बहुतांश बँकांनी व्याज दराला रेपो रेटशी लिंक केले आहे. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांना व्याज कमी पडत आहे. ज्या लोकांनी 2019 मध्ये होम लोन घेतले होते. त्यांना जास्त व्याजदराने हफ्ते द्यावे लागू शकतात. अशावेळी होम लोन रिफायनान्स करायला हवे की नाही.

होम लोनच्या घसरत्या व्याजदरांमुळे  लोन घेतलेल्यांना आपले लोनचे रिफायनान्सिंग केल्यास मदतीने बचत करण्याची चांगली संधी आहे. लोन रिफायनान्सिंगच्या मदतीने हफ्त्यानुसार कर्जाचे ओझे कमी करून लाखोंची बचत करता येऊ शकते. सोबतच लोन लवकरच फेडता येऊ शकते.

लोन रिफायनान्सिंग म्हणजे काय?

होम लोन रिफायनान्सिंगमध्ये कमी व्याजदर घेऊन नवीन कर्ज घेता येते. नवीन कर्जाने जुन्या कर्जाची परतफेड करता येते. नव्या कर्जामुळे मिळालेल्या पैशाने जुन्या कर्जाचे खाते बंद करता येते. नवीन कर्जाची फेड येथून पुढे सुरू करता येते. व्याज दर कमी असल्याने तुम्हाला हफ्ता कमी लागेल. आणि लाखोंची बचत होऊ शकते. लोन रिफायनान्सिंगच्या माध्यमांतून व्याजावर दीर्घ कालीन बचत वाढवता येऊ शकते.

उदाहरणार्थ

तुम्ही 20 वर्षासाठी 8 टक्के व्याजाचे 50 लाखाचे कर्ज घेतले आहे. या कर्जावर साधारण 50.37 लाख रुपये व्याज असेल. जर हे लोन रिफायनान्स केले. आणि त्याचा व्याजदर 7 टक्के असेल. तर तुमच्या व्याजात घट होऊन 43.03 इतके होईल. म्हणजेच जवळपास 7.34 लाखांची बचत होऊ शकेल.