Study on Frogs and Human Health: मनुष्य आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आहार आणि आजारी पडल्यावर औषधं घेतात. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की, बेडकांमुळे (Frog) तुम्ही सतत आजारी पडत राहाल, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही धक्कादायक बाब एका अभ्यासातून उघड झाली आहे. जीवनसाखळीत बेडकाचं महत्त्व यातून अधोरेखित होतं. बेडूक हा उभयचर प्राणी आहे. पण गेल्या काही वर्षात बेडकांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. सायन्स अलर्टच्या अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी उभयचर प्राण्यांच्या अभ्यासांवर लक्ष केंद्रित केले आहे. अभ्यासादरम्यान असा निष्कर्ष काढला आहे की जर बेडकांची संख्या कमी झाली तर त्याचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होईल.
आशिया आणि दक्षिण अमेरिकेत उभयचर प्राण्यांच्या 501 प्रजाती नामशेष झाल्या आहे. त्यांच्या मृत्यूमुळे फंगस जगभर वेगाने पसरत आहे. यासोबतच डास आणि डासांमुळे पसरणारे आजारही पसरत आहेत. कारण बेडूक आणि सॅलमँडर डासांची संख्या दूर करण्यात मदत करतात. ते त्यांच्या अळ्या खातात. डास हे बेडूक आणि सॅलमंडर्सचे मुख्य खाद्य आहेत.जगातील कोणत्याही भागात बेडकांसारख्या उभयचरांची संख्या कमी झाली की, त्या भागात मलेरियासारख्या आजाराचे रुग्ण वाढू लागतात. हा अभ्यास पर्यावरण संशोधन पत्रांमध्ये प्रकाशित झाला आहे.
आश्चर्यकारक! अन्नाच्या चवीवर गर्भातील मुलाने दिले असे Expression
या अभ्यासातून एकच निष्कर्ष निघतो, पृथ्वीवर अस्तित्वात असलेले प्राणी पर्यावरणाच्या समतोल राखण्यास कोणत्या ना कोणत्या प्रकारे हातभार लावतात. ही साखळी तुटली तर त्याचा मानवाच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. पृथ्वीवरील जवळजवळ सर्व प्रजातींशी असलेल्या मानवाच्या संवेदनशील नातेसंबंधावर शास्त्रज्ञ बारीक नजर ठेवतात. यात उभयचर प्राणी देखील आहेत.