विचित्र अपघात, कारच्या काचा तोडून आत घुसला घोडा

राजस्थानच्या जयपूरमध्ये घोड्याचा विचित्र अपघात झाला आहे. 

Updated: Jun 5, 2017, 04:45 PM IST
विचित्र अपघात, कारच्या काचा तोडून आत घुसला घोडा title=

जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये घोड्याचा विचित्र अपघात झाला आहे. टांग्याला बांधलेला घोडा उधळला आणि तो थेट कारमध्येच काच तोडून घुसला. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जयपूरमधल्या तापमानामुळे घोडा उधळल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रविवारी जयपूरमध्ये ४२ डिग्री तापमान होतं.

या अपघातामध्ये घोडा आणि कार चालवणारा जखमी झाला आहे. पंकज जोशी असं कार चालवणाऱ्याचं नाव आहे. उधळलेला घोडा थेट काच तोडून कारमध्येच घुसला. या घोड्याला अखेर पोलिसांनी बाहेर काढलं. या अपघातामध्ये पंकज जोशींच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे. 

पाहा अपघाताचा व्हिडिओ