राजौरी : जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात एक घोडा आणि त्या घोड्याच्या घोडेस्वाराला क्वारंटाईन केला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. घोडा आणि घोडेस्वाराला क्वारंटाईन केल्यानंतर याबाबत मोठी चर्चा सुरु आहे.
काश्मीर घाटीमधून एक व्यक्ती मुगल रोड मार्गाने मंगळवारी रात्री राजौरीतील थन्नामंडी येथे पोहचला. या व्यक्तीबाबत प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर कोरोनाच्या संशयामुळे घोडा आणि त्याच्या मालकाला क्वारंटाईन करण्यात आलं. एखाद्या प्राण्याला क्वारंटाईन केल्याची ही पहिलीच घटना आहे.
125 किलोमीटर अंतर घोड्यावरुन पार करत हा व्यक्ती कोरोना रेड झोन भाग असलेल्या शोपियांमधून राजौरीच्या थन्नामंडी येथे पोहचला.
J&K: A horse which returned to Rajouri from Shopian, along with its owner, is under home quarantine; the owner is in administrative quarantine. Tehsildar says "It is a red zone so we had to quarantine the man. The horse is under home quarantine at least till owner's result comes" pic.twitter.com/Ph8FqrORCS
— ANI (@ANI) May 27, 2020
घोड्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल, अशी भीती काही जणांना वाटत आहे. पण घोड्याला जरी कोरोना झाला तरी हो इक्यूइन कोरोना व्हायरस असेल. हा कोरोना व्हायरस कोव्हिड १९पेक्षा वेगळा असतो. घोड्याला कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळलेली नाही, तसंच त्याला २८ दिवस घरातच क्वारंटाईन करण्यात आलं. मालक कोरोना पॉझिटिव्ह असेल, तरच घोडा पॉझिटिव्ह होऊ शकतो. आम्ही औषधं देत आहोत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे इम्तियाज अंजुम यांनी दिली आहे.
People fear that horses can infect humans but that is equine coronavirus - different from #COVID19. Horse was asymptomatic&is in home quarantine for 28 days. It can turn out to be positive only if owner is positive. We're giving it antibiotics: Imtiaz Anjum, Animal Husbandry dept https://t.co/O7payTQ0pn pic.twitter.com/BelcvMjVD9
— ANI (@ANI) May 27, 2020
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत 1668 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 20हून अधिकांचा मृत्यू झाला आहे.