Aadhar Card वरील फोटो आवडत नाही! बदलण्यासाठी असं कराल Apply

आधार कार्ड देशातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्डवर (Aadhar Card) वैयक्तिक माहिती बायोमेट्रिक डिटेल्ससह स्टोअर केलेली असते. आधार कार्डावर 12 डिजिट यूनिक कोड दिलेला आहे.

Updated: Sep 20, 2022, 07:10 PM IST
Aadhar Card वरील फोटो आवडत नाही! बदलण्यासाठी असं कराल Apply title=

How To Update Aadhar Card Photo Know Process: आधार कार्ड देशातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्डवर (Aadhar Card) वैयक्तिक माहिती बायोमेट्रिक डिटेल्ससह स्टोअर केलेली असते. आधार कार्डावर 12 डिजिट यूनिक कोड दिलेला आहे. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तींना मिळतो. आधार कार्ड यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (UIDAI) जारी केलं जातं. आधार कार्डमध्ये वेळोवेळी बदल देखील केले जात आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी नवनवी माहिती त्यात अपडेट केली जात आहे. काही लोक आपल्या घरचा पत्ता, फोन नंबर आणि फोटो अपडेट करतात. आधार कार्डवरील फोटो अपडेट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. यासाठी यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवरून नोंदणी करावी लागेल आणि जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावं लागेल. 

तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर प्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in उघडावी लागेल. यानंतर तुम्हाला My Aadhar च्या पर्यायावर जावे लागेल. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. तुम्हाला डाउनलोड विभागात जाऊन आधार नोंदणी/अपडेट फॉर्मच्या पर्यायावर जावे लागेल. येथे सर्व माहिती भरल्यानंतर जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जमा करा. आधार कार्यकारी बायोमेट्रिक पडताळणीद्वारे तुमच्या सर्व तपशीलांची पुष्टी करेल. यानंतर, तो तुमच्या नवीन फोटो क्लिक करेल आणि आधार कार्डमध्ये अपडेट होईल.

नवीन अपडेटेड आधार कार्ड येण्यासाठी 90 दिवस लागतात. तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन तुमचे आधार कार्ड प्रिंट काढू शकता. तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून अपडेट केलेल्या आधारची ई-आधार कॉपी देखील डाउनलोड करू शकता. ही सेवा मोफत नाही. यासाठी तुम्हाला जीएसटीसोबत 100 रुपये शुल्क भरावे लागेल.