तुरुंगात असताना संजय राऊतांनी उंदरांना कोणती नावं दिली होती? जाहीर सभेत सांगितला मजेशीर किस्सा

महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने zee 24 taas वर 'जाहीर सभा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत यांना आमंत्रित करण्यात आले होते

पुजा पवार | Updated: Nov 2, 2024, 08:44 PM IST
तुरुंगात असताना संजय राऊतांनी उंदरांना कोणती नावं दिली होती? जाहीर सभेत सांगितला मजेशीर किस्सा  title=
(Photo Credit : Social Media)

Sanjay Raut On Jail Experience : महाराष्ट्र विधानसभा 2024 चं बिगुल वाजलं असून राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने zee 24 taas वर 'जाहीर सभा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी संजय राऊत यांनी तुरंगात असताना घडलेले काही मजेशीर किस्से सांगितले. 

Zee 24 तासच्या जाहीर सभा या कार्यक्रमात संजय राऊत यांनी शिवसेनेत बंडखोरी, तुरुंगातील अनुभव, आगामी पुस्तक या सर्व प्रश्नांवर उत्तरे दिली. 2022 मध्ये पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती, त्यानंतर ते तीन महिने न्यायालयीन कोठडीत होते. तब्बल 100 दिवस संजय राऊत यांनी मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमध्ये घालवले. या 100 दिवसात तुरुंगात आलेले अनुभव राऊतांनी सांगितले. 

हेही वाचा : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊतांनी स्पष्ट सांगून टाकलं!

 

उंदरांना कोणती नाव दिली होती?

संजय राऊतांनी सांगितलं की तुरुंगात ते राहत असलेल्या बरॅकीमध्ये मांजरी एवढे उंदीर होते. त्या उंदरांना अनिल देशमुख यांनी काही नाव दिली होती. यावेळी उंदरांना नेमकी कोणती नाव दिली होती असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा राऊत यांनी म्हंटले की, देशमुख उंदीरांना राजकीय नेत्यांच्या नावाने हाक मारायचे. यावर कोणत्या नेत्यांच्या नावाने तुरुंगातील उंदरांना हाक मारायचात असं विचारल्यावर अनिल देशमुख आल्यावर तुम्हीच त्यांनाच विचारा असं त्यांनी म्हंटले. यावर तुरुंगातील उंदीर बंडखोर होते का? असाही प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. यावर राऊत म्हणाले की, 'ती गलीत गात्र उंदीर होती खाऊन खाऊन माजलेली'.

तुरुंगातला स्वर्ग म्हणजे नक्की काय?

संजय राऊत यांचं तुरुंगातील अनुभवांवर एक पुस्तक येणार असून याच नाव 'नरकारतला स्वर्ग' असे आहे. पण तुरुंगातील स्वर्ग कधी पाहायला मिळतो? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी राऊत म्हणाले, 'तुरुंगातला अनुभव हा नरकच असतो. तेथे कधी काळोख होत नाही. प्रखर उजेडामध्ये तुम्हाला दिवस-रात्र काढायची असते. झोप येत नाही. हवं तसं अन्न, पाणी मिळत नाही. जगातल्या सर्व तुरुंगात हीच स्थिती असते. फार फार तर तुम्हाला पाण्याची बॉटल मिळाली तरी खूप हायसं वाटतं. मी कधी चहा पित नाही. पण त्यावेळी कोणी चहा विचारला तरी बर वाटायचंट, असे ते म्हणाले.