तुमचं आधार कार्ड बनावट? खरं की खोटं कसं जाणून घ्यायचं, जाणून घ्या

तुमच्याकडे असलेलं Aadhaar Card नकली तर नाही? कसं करायचं Verify

Updated: Jul 10, 2021, 10:15 PM IST
तुमचं आधार कार्ड बनावट? खरं की खोटं कसं जाणून घ्यायचं, जाणून घ्या title=

मुंबई: आजच्या काळात आपलं ओळखपत्र म्हणजे आधारकार्ड सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आधारकार्ड नसेल तर अनेक कामं खोळंबली जातात. इतकच नाही तर आधारकार्डवर सगळी माहिती एक क्लिकमध्ये येते. आधारकार्ड नसेल तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाजवळ आधारकार्ड असणं आवश्यक आहे. 

रेशन कार्ड आणि मतदान कार्ड प्रमाणेच आधार कार्ड देखील आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. केवळ आधार कार्डाच्या सहाय्याने आपण बरीच कामे साध्य करू शकतो, अशा परिस्थितीत आधारशी संबंधित अनेक फसवणुकीचे प्रकारही पाहायला मिळतात. ही समस्या डोळ्यासमोर ठेवून युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) आता यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे.

UIDAI व्हेरिफिकेशन कसं करायचं? इंडियन आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सोशल मीडियावरील लोकांना फसवणुकदारांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं. यूआयडीएआयने ट्वीटद्वारे आधार कार्डच्या पडताळणीची पद्धत स्पष्ट केली. यूआयडीएआयच्या मते, आधार कार्ड ऑनलाइन पडताळणी दोन प्रकारे करता येते. आधार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीनं करता येतं.

आधार क्रमांक व्हेरिफाय करण्यासाठी resident.uidai.gov.in/verify या वेबसाइटला भेट द्या. तिथे 12 अंकी आधार क्रमांक लिहा. त्यानंतर सिक्युरिटी कोड आणि कॅप्चर भरावा लागणार आहे. त्यानंतर, 'प्रॉसिड टू व्हेरिफाई' वर क्लिक केल्यानंतर तुमची आधार माहिती समोर येईल. अशा प्रकारे आपल्याला आपला आधार कार्ड बनावट आहे की नाही हे समजू शकणार आहे. आधारकार्ड ऑफलाइन चेक करायचं असेल तर क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही माहिती मिळवू शकता.