तुमचं पीएफ अकाऊंट आधारशी असं लिंक करा

पीएफ अकाऊंट आधार क्रमांकाशी लिंक असणं आवश्यक आहे

Updated: Nov 17, 2019, 12:42 PM IST
तुमचं पीएफ अकाऊंट आधारशी असं लिंक करा title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पीएफ कर्मचाऱ्यांना, पीएफ अकाऊंट आधार क्रमांकाशी लिंक करणं आवश्यक आहे. EPFOने आधार कार्ड पीएफ अकाऊंटला जोडण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरु केली आहे. या सेवेअंतर्गत सहजपणे आधार क्रमांक पीएफ अकाऊंटशी जोडता येऊ शकतो.

पीएफ अकाऊंट आधारशी जोडल्यानंतर पीएफ अकाऊंट होल्डरला त्याच्या PFसंबंधी सर्व अपडेट्स मिळू शकतात. 

आधारशी असं लिंक करा पीएफ अकाऊंट - 

- पीएफ अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी EPFOची वेबसाइट www.epfindia.gov.in वर लॉग इन करा

- लॉग इन केल्यानंतर Online Services मधून e-KYC Portal वर क्लिक करा. त्यानंतर link UAN aadhar वर क्लिक करा.

- एक नवीन पेज ओपन होईल, त्यात UAN नंबर आणि UAN अकाउंटवरुन रजिस्टर्ड मोबाइल नंबर अपलोड करावा लागेल.

- तुमच्या मोबाईल नंबरवर OTP नंबर येईल. OTP बॉक्समध्ये ओटीपी नंबर भरल्यानंतर, खाली दिलेल्या चौकटीमध्ये तुमचा १२ अंकी आधार क्रमांक भरा. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. त्यानंतर समोर प्रोसिड टू OTP व्हेरिफिकेशन ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करा. 

- पुन्हा एकदा आधारची माहिती व्हेरिफाय करावी लागेल. माहिती व्हेरिफाय झाल्यानंतर आधारशी लिंक मोबाईल नंबर किंवा मेलवर OTP येईल. व्हेरिफिकेशननंतर आधार पीएफ अकाऊंटशी लिंक होईल.

  

सरकारी, खासगी नोकरदार वर्गाचा पीएफ (PF) म्हणजेच एंप्लॉई प्रॉव्हिडंट फंड अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी महिन्याच्या पगारातून पीएफ अकाऊंटमध्ये जमा केला जातो. सर्वसाधारणपणे पगाराच्या १२ टक्के रक्कम आणि तेवढीच रक्कम कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा होते. पीएफ खात्याची इपीएफओ कार्यालयाकडे अधिकृत नोंद असते. ८.६५ टक्के दराने पीएफ खात्यात व्याज जमा होते.