शरद पवारांनी वाहिली बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली

पवारांची बाळासाहेबांना आदरांजली

Updated: Nov 17, 2019, 10:50 AM IST
शरद पवारांनी वाहिली बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली title=

मंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त ट्विट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. 'प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन! असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो ही ट्विट केला आहे.

Image

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झालेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त शिवाजी पार्कवर फुलांची सजावट करण्यात आलीय. स्मृतीदिनानिमित्त खास जय श्री राम अशी फुलांची रांगोळी देखील काढण्यात आल्याचं पहायला मिळतंय.