क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करायचा माहीत आहे का? जाणून घ्या

 तुम्हाला क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करायचा हे माहिती नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

Updated: Jul 21, 2022, 05:03 PM IST
क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करायचा माहीत आहे का? जाणून घ्या title=

How To Use Credit Cards: तुम्हाला क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करायचा हे माहिती नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बर्‍याच लोकांना क्रेडिटकार्डचा वारेमाप वापर डोकेदुखी ठरते. खरेतर, क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यास वापरकर्त्याला प्रचंड (40 टक्के पर्यंत) व्याज द्यावे लागते. म्हणून काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरुन तुम्हाला भुर्दंड होणार नाही आणि या कार्डचा चांगला फायदा देखील घेऊ शकता. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य कार्ड वापरत असल्याची खात्री करा. तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग प्रवासावर खर्च करत असाल, जसे की फ्लाइट तिकीट, हॉटेल यासाठी ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड वापरा. ​​यामुळे तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट देखील मिळू शकतात.

क्रेडिट कार्ड वापरण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या खरेदीचे मासिक हप्त्यांमध्ये रूपांतर करणे. याद्वारे तुम्ही तुमच्या सोयीनुसार बिले भरू शकता. यामुळे तुमच्यावर मोठी रक्कम भरण्याचा दबाव राहणार नाही.

अनेक बँका त्यांच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना त्यांची न वापरलेली क्रेडिट मर्यादा नाममात्र व्याजाने वैयक्तिक कर्जामध्ये रूपांतरित करण्याची परवानगी देतात. हे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना त्यांच्या तात्काळ गरजा काही वेळात पूर्ण करण्यास मदत करते.

तुम्ही ऑनलाइन खरेदी करता तेव्हा क्रेडिट कार्ड 2x रिवॉर्ड पॉइंट देतात. बँकबाजार म्हणतो की, खरेदीमध्ये क्रेडिट कार्डचा वापर योग्य आहे.

बँका त्यांच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना हॉटेल बुकिंग, फ्लाइट तिकीट इत्यादींवर सूट मिळवण्यासाठी त्यांचे रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याची परवानगी देतात. हे रिवॉर्ड पॉइंट वापरकर्त्यांना खास शॉपिंग व्हाउचर, कॅशबॅक आणि रिचार्ज व्हाउचर प्रदान करतात.