दारू पिऊन विहिरीत पडलेल्या बेपत्ता पतीला बायकोने 'त्या' एका गोष्टीवरून ओळखलं, पोलिसही पडले 'चाट'!

पोलिसांनी जंग जंग पछाडलं, शेवटी बायकोला बोलावून घेतलं तिने...

Updated: Dec 5, 2022, 08:28 PM IST
दारू पिऊन विहिरीत पडलेल्या बेपत्ता पतीला बायकोने 'त्या' एका गोष्टीवरून ओळखलं, पोलिसही पडले 'चाट'!

Drunk Truck Driver : दारू पिल्यावर चंद्रावर गेलेले मद्यपी काय करतील याचा काही नेम नाही. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये फरार ट्रक चालकाचा तपास त्याच्या बायकोने केला आहे. पोलिसांनी खूप तपास केला मात्र त्यांना काहीच तपास लागला नाही. शेवटी त्यांनी त्याच्या बायकोला याबाबत माहित दिली आणि बोलावून घेतलं. काही वेळातच तिने आपल्या नवऱ्याचा शोध घेतला.  

Add Zee News as a Preferred Source

नेमकं काय आहे प्रकरण? 
मूळचा हाथरसचा इथला रहिवासी असलेला ट्रक ड्रायव्हर अलिगढला गेला होता. जाताना त्याने रस्त्यामध्ये दारू प्यायली त्यामुळे तो पूर्णपणे झिंगला. नशेत तो एका हॉटेल जवळ असलेल्या विहिरीमध्ये पडला. त्यालाही समजलं नाही की तो विहिरीमध्ये पडला आहे. त्यामुळे वेळेत ट्रक माल पोहोचवायच्या ठिकाणी पोहोचला नाही. त्यामुळे ट्रक मालकाने पोलिसांना चालकाची गायब असल्याची तक्रार दिली. 

शेवटी तपास केल्यावर चालक ज्या हॉटेलजवळ थांबला होता त्या ठिकाणी पोलीस आणि ट्रकमालक पोहोचले. पोलिसांनी हॉटेलच्या आवारामध्ये शोध घेतला मात्र कुठेही त्यांना चालक दिसून आला नाही. शेवटी त्यांनी चालकाच्या पत्नीला बोलावून घेतलं, त्यावेळी चालकाच्या पत्नीने हॉटेलजवळील एका कोरड्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं. विहिरीमध्ये लाल स्वेटर दिसला. त्यावरून तिने सांगितलं की तो माझा पती आहे. 

पोलिसांनी आणि काही लोकांनी एकत्र येत तिच्या नवऱ्याला बाहेर काढलं. कोरडी विहिरीमध्ये चालक बेशुद्द अवस्थेत पडला होता. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.

About the Author