Border Gavaskar Tophy Sydney 5th Test: बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Tophy) अखेरच्या निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर धारातीर्थी पडले आहेत. सिडनीमधील कसोटी सामन्यात भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज के एल राहुल (K L Rahul) आणि यशस्वी जैसवाल (Yashavi Jaiswal) मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरले. विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) चांगल्या भागीदारीच्या दिशेने वाटचाल करत असताना पहिल्या सत्राच्या शेवटच्या चेंडूवर आणि नेथनच्या गोलंदाजीवर शुभमन झेलबाद झाला. स्टीव्ह स्मिथने शुभमनचा झेल घेतला. शुभमनच्या विकेटचं श्रेय स्टीव्ह स्मिथलाच द्यावं लागेल, कारण त्यानेच त्याला अस्थिर केलं.
सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये कशाप्रकारे स्लीपमध्ये उभा असलेला स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिलचं स्लेजिंग करत होता हे दिसत आहे. स्टीव्ह स्मिथ सतत काहीतरी बोलत शुभमन गिलला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या या प्रयत्नांना यश मिळालं आणि यशस्वी पुढे जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात स्मिथकडे झेल देऊन बाद झाला.
— smithy (@stevesmith50) January 3, 2025
फलंदाजी करताना शुभमन गिल खेळपट्टी तपासत होता, त्यावेळी स्टीव्ह स्मिथ हे बकवास आहे (This is Bullshit) असं म्हणतो. त्यावर शुभमन गिल त्याला उत्तर देत 'तू तुझा वेळ घे स्मिथी, कोणीही तुला काही बोलत नाही आहे'. यानंतर मार्नस डिवचत 'हो तू बोलतोय' असं उपहासात्मकपणे म्हणतो. पुढे मार्नस स्मिथला तू तुझा वेळ घे असं उपहासात्मकपणे म्हणतो. त्यावर स्मिथ हो मी घेतो असं म्हणतो. यानंतर पुढच्या चेंडूवर शुभमन गिल पुढे जाऊन चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात स्मिथकडे झेल देतो आणि तंबूत परततो.
शुभमन गिलनंतर विराट कोहलीही मैदानावर फार काळ टिकला नाही. ऋषभ पंतने 80 चेंडूत 32 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. फलंदाजी करताना ऋषभ पंतच्या शरिरावर अनेकदा चेंडू लागला. पण तरीही तो मैदानावर टिकून राहण्याचा प्रयतन केला. रवींद्र जडेजाने 50 चेंडूत 11 धावा केल्या. पाचव्या विकेटसाठी दोघांनी मिळून 35 धावा केल्या. दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने 25 ओव्हरमध्ये फक्त 50 धावा केल्या.
रोहित शर्माने खराब फॉर्ममुळे या सामन्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. भारतीय संघ 185 धावांवर सर्वबाद झाला असून, ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलैंडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. भारताने हा सामना गमावल्यास मालिकाही गमावणार आहे.