पती-पत्नीमध्ये पकडा-पकडीचा थरार, भर रस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; पाहा Video

महिला आपल्या पतीपासून लपून छपून परपुरुषासोबत फिरत होती. पतीने आपल्या पत्नीला (Husband wife clash) फिरताना रंगेहाथ पकडलं अन्..

Updated: Oct 20, 2022, 05:25 PM IST
पती-पत्नीमध्ये पकडा-पकडीचा थरार, भर रस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; पाहा Video title=

Agra Viral video : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रामध्ये (Agra Viral Video) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला आपल्या पतीपासून लपून छपून परपुरुषासोबत फिरत होती. पतीने आपल्या पत्नीला (Husband wife clash) फिरताना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर जे झालं ते पाहून तुमच्याही हृद्याचे ठोके वाढल्याशिवाय राहणार नाही.

सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral Video) व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला पांढऱ्या कपड्यांमध्ये तोंड झाकून एका स्कूटीवर मागच्या बाजूला दिसतीये. त्यावेळी दुसरी एक व्यक्ती मागून येतो आणि स्कूटी थांबवायला सांगू लागतो. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून, दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा पती असल्याचं समोर आलंय.

पत्नीला तिच्या मित्रासोबत रंगेहाथ पकडलं. पतीला समोर पाहून पत्नीला धक्काच बसला. त्यानंतर सुरू झाला पकडा पकडीचा खेळ... यावेळी पतीने पत्नीला जबर शिविगाळ सुरु केली. पती पत्नीच्या मित्राला गाडी थांबवण्यास सांगू लागला. मात्र, तिच्या मित्राला मरणाची भीती. तिने सगळा राग काढायला सुरुवातही केली. त्यावेळी दोघांमध्ये हाणामारी देखील झाली.

आणखी वाचा - मंगळवारी मटण बनवलं आणि...; पती-पत्नीच्या वादात गेला शेजाऱ्याचा जीव

पतीच्या मागे बसलेल्या व्यक्तीने ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. भर दुपारी हा सगळा हायव्होल्टेज ड्रामा घडला होता. बायकोचं दुसऱ्या कुणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला आला होता. त्यानंतर एक दिवस पतीने पत्नीचा पाठलाग केला. त्यावेळी त्यांची मुलगी देखील सोबत होती. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, प्रकरण गंभीर असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. सगळ्यांना घेऊन पोलीस ठाण्यात आणलं आणि दोघांना समज देऊन सोडून देण्यात आलंय. 10 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडणं सुरु झालं होतं. महिला गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद वागत होती. तिचे एका व्यावसायिकाशी संबंध असल्यावरुन पतीला संशय होता.