बॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकणाऱ्या IAS अधिकाऱ्याचा साखरपुडा; Photo मध्ये पाहा होणारी पत्नी

कधी पाहिलंय का, साखरपुड्याचं कॉन्ट्रॅक्ट....   

Updated: Jul 7, 2022, 02:37 PM IST
बॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकणाऱ्या IAS अधिकाऱ्याचा साखरपुडा; Photo मध्ये पाहा होणारी पत्नी  title=
IAS Athar Amir Mehreen Qazi Engagement photos video viral

Athar Aamir Khan Mehreen Qazi Engagement Video: भल्याभल्या बॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकणाऱ्या आयएएस अधिकारी अतहर आमिर खान (Athar Aamir Khan) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. (Athar Aamir Khan). यावेळी निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांच्या साखरपुड्याचे व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ. 

टीना डाबी (Tina Dabi) यांच्याशी लग्न आणि त्यानंतर घटस्फोटाच्या वळणावरून पुढे आल्यानंतर आता अतहर आमिर खान दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

मुळच्या काश्मीरच्या असणाऱ्या डॉक्टर मेहरीन काजी (Mehreen Qazi) यांच्यासोबत त्यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. यावेळी मेहरीननं आयव्हरी रंगाच्या लेहंग्याला पसंती दिली होती. तर, अतहर यांनी काळ्या सूटचा पर्याय निवडला होता. 

साखरपुड्यालाच कॉन्ट्रॅक्ट? 
ऐकायला कितीही वेगळं वाटलं, तरी हे खरंय. अतहर यांनी साखरपुड्याच्या आधीच मेहुण्यांकडून देण्यात आलेल्या एका कॉन्ट्रॅक्टवर सही केली. मेहरीन कायम बरोबरच असेल, 2-3 महिन्यांनी तिला फिरण्यासाठी परदेशात न्याल, तिला जेव्हा केव्हा खरेदी करण्याची इच्छा असेल तेव्हा तुम्ही अडवणार नाही या अटी त्यामध्ये लिहिण्यात आल्या होत्या. 

आपल्यापुढे ठेवण्यात आलेल्या या सर्व अटींचा अतहर यांनी हसत हसत स्वीकार केला. सोशल मीडियावर या गोड क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. 

संपूर्ण देशात सध्या या जोडप्याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. नाकीडोळी दोघांचंही सौंदर्य अनेकांच्या मनात घर करत आहे, त्यांच्याकडे पाहून नकळतच काहीजण प्रतिक्रियाही देत आहेत, जोडा शोभतोय बरं....!