IAS Success Story : आजोबांमुळे दिली UPSC परीक्षा, आता अपराजिता यांचं असं बदललं आयुष्य

लहानपणी अपराजिताला अधिकारी होणं काय असतं हे माहीत नव्हतं, पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिने ते गांभीर्याने घेतलं.

Updated: Jul 19, 2022, 05:04 PM IST
IAS Success Story : आजोबांमुळे दिली UPSC परीक्षा, आता अपराजिता यांचं असं बदललं आयुष्य title=

मुंबई : लहानपणी जर तुम्ही कोणालाही विचारलं की तुला मोठं होऊन काय बनायचं असं विचारलं तर तुम्हाला कोणीही डॉक्टर, इंजिनिअर, टीचर असं काहीसं सांगून मोकळं होतात. परंतु कधीही कोणताही लहानमुल तुम्हाला आयएएस अधिकारी वैगरे असं काही सांगत नाही. कारण त्यांना या सगळ्या गोष्टींबद्दल मुळातच माहिती नसतं. परंतु असं असलं तरी आज आम्ही तुम्हीला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, त्याव्यक्तीने लहानपणापासून आयएएस होण्याचं ठरवलं होतं आणि ते पूर्ण देखील केलं.

असं म्हणतात की देशात सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे, UPSC परीक्षा. ही परीक्षा पास होणं सहजा-सहजी शक्य नाही. यासाठी संघर्ष आणि चिकाटी आवश्यक आहे. ही इच्छा आयएएस अधिकारी अपराजिता शर्मा यांनी मनात ठेवली आणि आज त्यांनी ते पूर्ण देखील करुन दाखवलं आहे.

आयएएस अधिकारी अपराजिता शर्मा मुळच्या बनारसच्या रहिवासी आहेत. त्यांना लहानपणी आयएएस अधिकारी कोण आहे हेही माहीत नव्हते. यासाठी कोणती परीक्षा असते आणि त्यासाठी काय करावं लागतं, हे देखील त्यांना माहित नव्हतं. पण तरीही लहानपणापासून आयएएस अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होतं. त्यांचे आजोबा त्यांना नेहमी सांगत होते की, त्यांची नात एक दिवस अधिकारी होईल.

लहानपणी अपराजिताला अधिकारी होणं काय असतं हे माहीत नव्हतं, पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिने ते गांभीर्याने घेतलं आणि करिअर म्हणून निवडलं. अपराजिताच्या मते, या पदामुळे केवळ प्रतिष्ठाच नाही तर समाधानही मिळते. अपराजिताने 2017 मध्ये 40 व्या ऑल इंडिया रँकसह परीक्षा उत्तीर्ण केली होती. यातून त्यांचे बालपणीचे स्वप्न साकार झाले.

अपराजिता यांनी त्यांचे शालेय शिक्षण बनारसमधून केले, त्यानंतर त्यांनी पदवीसाठी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची येथे प्रवेश घेतला. त्यांचे वडील आयआरएस अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत आणि त्यांची आई प्राध्यापक आहे. पदवीनंतर अपराजिताला एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. त्यांच्या विभागात त्या एकट्याच महिला होत्या. तिच्या कंपनीतील काही घटनांनी अपराजिताला प्रेरणा दिली आणि मग त्यांनी नागरी सेवा परीक्षेसाठी प्रयत्न करण्याचे ठरवले.

आयएएसची तयारी कशी करावी, अपराजिताने सांगितले
ती पुस्तके मर्यादित ठेवण्याची शिफारस करतात परंतु त्यांची वारंवार उजळणी करणे अधिक महत्त्वाचे आहे. तुमची रणनीती तुमच्या सामर्थ्य आणि कमकुवततेनुसार बनवा कारण प्रत्येकजण वेगळा असतो. रोजची उद्दिष्टे ठरवा आणि ती पूर्ण करा.

आयएएसची तयारी कशी करावी, अपराजिताने सांगितले

अपराजिता मूलभूत गोष्टींसाठी NCERT पुस्तकांना खूप महत्त्व देतात. त्या ६वी ते १२वीपर्यंत एनसीईआरटीच्या जास्तीत जास्त विषयांची पुस्तके वाचत असे, विशेषत: भूगोल. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्रांवर लक्ष केंद्रित केले. अपराजिता यांनी सांगितलेली पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुलाखतीदरम्यान कधीही खोटे बोलू नका. तिथे बसलेले लोक तुमच्यापेक्षा हुशार आहेत, ते तुमचे खोटे काही सेकंदात पकडतील.

त्यामुळे तुम्हाल जर उत्तर माहीत नसेल तर तसं सांगावं. तसेच त्यांनी सांगितलं की, तुमच्या मनात जे आहे ते बोलणे कधीही चांगले, कारण इथे तुमच्या प्रामाणिकपणाची परीक्षा होत आहे, तुमच्या ज्ञानाची नाही.