ICICI च्या ग्राहकांसाठी खूशखबर; बँकने घेतला मोठा निर्णय

 ICICI Bank Hikes FD Rates: आरबीआयच्या घोषणेपूर्वीच, खाजगी क्षेत्रातील बड्या बँक आयसीआयसीआय बँकेने 2 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत एफडीवरील व्याजदर (ICICI Bank Fixed Deposit Rate) बदलले आहेत.

Updated: Jun 8, 2022, 03:51 PM IST
ICICI च्या ग्राहकांसाठी खूशखबर; बँकने घेतला मोठा निर्णय title=

नवी दिल्ली : ICICI Bank Hikes FD Rates: आरबीआयच्या घोषणेपूर्वीच, खाजगी क्षेत्रातील बड्या बँक आयसीआयसीआय बँकेने 2 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत एफडीवरील व्याजदर (ICICI Bank Fixed Deposit Rate) बदलले आहेत. बँकेने 7 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतच्या FD वर जास्त व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. 

ICICI Bank Hikes FD Rates: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केली आहे. याआधीही ICICI ने FD मध्ये (FD Interest Rate Hike) वाढ करण्याची घोषणा केली आहे. ICICI बँकने 7 जूनपासून वाढीव व्याजदर लागू केले आहेत. 

बँकेने दिली माहिती 
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेने एफडीवरील व्याजदर 2 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत बदलले आहेत. बँक आता 7 दिवसांपासून ते 5 वर्षांच्या कालावधीच्या FD वर अधिक व्याज देत आहे. बँकेच्या या निर्णयाचा ग्राहकांना खूप फायदा होणार आहे, कारण ICICI ही देशातील एक मोठी खाजगी बँक आहे.