Video: जाळ्यात अडकलेल्या सापाची अशी भागवली तहान, व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका

आपला जीव धोक्यात घालून सापाला मदत करत असल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. 

Updated: Jun 8, 2022, 03:44 PM IST
Video: जाळ्यात अडकलेल्या सापाची अशी भागवली तहान, व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका title=

मुंबई: सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भावनिक असतात की अश्रू अनावर होतात. त्यात प्राणी-पक्ष्यांचे व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. असाच एक तहानलेल्या कोब्राचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक व्यक्ती जाळ्यात अडकेल्या सापाला पाणी पाजताना दिसत आहे. आपला जीव धोक्यात घालून सापाला मदत करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. 

ओडिशाच्या भद्रक भागात एक भला मोठा विषारी मोनोक्लड कोब्रा सुमारे 6 दिवस माशांच्या जाळ्यात अडकला होता. तहानलेल्या सापाला पाण्याच्या बाटलीतून पाणी पाजताना दिसत आहे. सापाला इतकी तहान लागली असते तो वेगाने पाणी प्यायला लागतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी सापाला मदत केल्याबद्दल त्या माणसाचे आभार मानले आहेत. 9 मिनिटं 31 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत 70 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सापाची सुटका केल्यानंतर त्याला जंगलात सोडले.

व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले आहे की, ' सापाला वाचवल्याबद्दल अभिनंदन. देव तुम्हाला आशीर्वाद देवो!,  दुसऱ्या युजर्सने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, 'साप किती तहानलेला होता. सरांनी सापाची तहान भागवली आणि त्याला वाचवले. संपूर्ण टीमचे आभार. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, 'आश्चर्यकारक. साप बचाव आणि पाण्याबद्दल खूप कृतज्ञ होता. दरम्यान, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की अशा विषारी प्राण्याला हाताळण्यासाठी तुम्ही तज्ञ असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे तज्ञ नसल्यास त्यांच्याकडे जाण्याचा कधीही प्रयत्न करू नका.