कमाईची जबरजस्त संधी; फक्त 5000 रुपये लावून भन्नाट रिटर्न; 29 जुलैपासून स्किम सुरू

जर तुम्ही गुंतवणूक आणि चांगल्या परताव्यासाठी स्किमच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे

Updated: Jul 28, 2021, 12:25 PM IST
कमाईची जबरजस्त संधी; फक्त 5000 रुपये लावून भन्नाट रिटर्न; 29 जुलैपासून स्किम सुरू

मुंबई : जर तुम्ही गुंतवणूक आणि चांगल्या परताव्यासाठी स्किमच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. IDFC Mutual Fund 29 जुलै रोजी IDFC US Equity Fund of Fund (FoF)लॉंच करणार आहे. यामाध्यमातून तुमचा पैसा अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये लावता येणार आहे. ही स्किम गुंतवणूकदारांसाठी 12 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. जर तुम्ही NFO मध्ये पैसे गुंतवू इच्छिता तर या फंडबद्दल सविस्तर माहिती घ्या

कमीत कमी 5 हजार रुपयांची गुंतवणूक गरजेची
IDFC US Equity Fund of Fund एक ओपन एंडेट स्किम आहे.  यात कमीत कमी 5 हजार रुपये गुंतवणूक करता येईल. त्याशिवाय SIP करू इच्छिता तर कमीत कमी 1 हजार रुपये प्रति महिना गुंतवावा लागेल. 

ही योजना त्या गुंतवणूकदारांसाठी आहे ज्यांना दीर्घ अवधीसाठी गुंतवणूकीतून बक्कळ परतावा हवा आहे. ज्या गुंतवणूकदारांना  विदेशी शेअरमार्केटमध्ये आपला पैसा लावून पोर्टफोलियओ डायव्हर्सिफाय ठेवायचा आहे. त्यांच्यासाठीही ही चांगली स्कीम आहे.

NFO काय असते.
जेव्हा एखादी एसेट मॅनेजमेंट कंपनी नवीन फंड लॉंच करते आणि तो फक्त काही दिवसांसाठीच खुला असतो. एका प्रकारे नवीन फंडची सुरूवात करण्यासाठी पैसा उभा केला जातो. यासर्व प्रक्रीयेला न्यू फंड ऑफर असे म्हणतात