मुंबई : भारतात अशी अनेक चमत्कारिक मंदिरं आहेत, जी केवळ सर्वसामान्यांसाठीच नाही तर वैज्ञानिकांनाही आश्चर्यचकित करणारी आहेत. त्यांचे गूढ आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेलं नाही. भारतात अनेक रहस्यमय मंदिरं आहेत आणि त्यांचे रहस्य आजतागायत उकललेलं नाही. असंच मातेचं असे रहस्यमय आणि चमत्कारिक मंदिर आहे, जे विज्ञान आणि शास्त्रज्ञांसाठीही आश्चर्यच आहे. हे रहस्यमय मंदिर बिहारमध्ये आहे. इथल्या मूर्ती मध्यरात्री आश्चर्यकारक काम करतात, असा दावा केला जातो.
हे मंदिर बिहारच्या बक्सर जिल्ह्यात आहे. राज राजेश्वरी त्रिपुरा सुंदरी मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. असं म्हणतात की या मंदिरातील मूर्ती आपापसात बोलतात. शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं तेव्हा त्यांनीही हे नाकारलं नाही. असं म्हणतात की, हे रहस्यमय मंदिर 400 वर्षे जुनं आहे. या मंदिराची स्थापना प्रसिद्ध तांत्रिक भवानी मिश्र यांनी केली होती.
या मंदिराविषयी असं म्हटलं जातं की, या ठिकाणी कोणी नसतानाही अनेक प्रकारचे आवाज ऐकू येतात. राज राजेश्वरी त्रिपुरा सुंदरी मंदिराची सर्वात अनोखी धारणा अशी आहे की, याठिकाणी स्थिर निशामध्ये स्थापित केलेल्या मूर्तींमधून बोलण्याचे आवाज येतात. मध्यरात्री लोक जेव्हा येथून जातात तेव्हा त्यांना आवाज ऐकू येतो.
त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, शास्त्रज्ञांनी याठिकाणी मूर्ती खरोखर बोलतात का यावर संशोधन केलं. संशोधनानंतर, शास्त्रज्ञांनी देखील मान्य केलं की हा भ्रम नाही. काही शब्द या मंदिराच्या आवारात घुमत राहतात.
याठिकाणी शास्त्रज्ञांचं एक पथक संशोधनासाठी गेलं होतं. शास्त्रज्ञांनी याठिकाणी विचित्र आवाजही ऐकू आला. शास्त्रज्ञांनी देखील हे मान्य केलंय की, होय, याठिकाणी काहीतरी विचित्र घडतं, ज्यामुळे याठिकाणी आवाज येतो.