नवी दिल्ली : सरकारी कामांसाठी इनकम टॅक्स रिटर्न, पासपोर्ट, बँक अकाऊंट आणि इतर सर्वच कामांसाठी आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. अनेकदा आधार कार्ड हरवलं असल्यास, आधार कार्ड अद्याप घरी आलं नाही, आधारकार्डची एनरोलमेंट स्लिप हरवली असल्यास, मोठी समस्या होऊ शकते. पण अशाप्रकारे आधारकार्ड बाबत कोणतीही समस्या असल्यास त्यावर अगदी सोप्या उपायाने आधार क्रमांक मिळवता येऊ शकतो.
आधार कार्ड बनवण्याआधी एनरोलमेंट प्रोसेस करावी लागते. आधार सर्व्हिस सेंटरमध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी काही माहिती घेतली जाते. त्यानंतर आधार कार्ड काढणाऱ्याला एक स्लिप दिली जाते. त्याला एनरोलमेंट स्लिप म्हणतात. एनरोलमेंट स्लिपवर लिहिलेल्या क्रमांकावरुन आधार कार्डचं स्टेटस माहिती करता येतं. आधार कार्डच्या स्टेटसबाबत माहिती मिळवण्यासाठी UIDAI च्या वेबसाईटवर माहिती घ्यावी लागते.
UIDAIची वेबसाइट www.uidai.gov.in या लिंकवर क्लिक करा. होम पेजवर अनेक टॅब ओपन होतील. त्यापैकी पहिला टॅब My Aadhaarवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यावर अनेक ऑप्शन दिसतील. त्यापैकी Retrieve Lost or Forgotten EID/UID या ऑप्शनवर क्लिक करा.
Retrieve Lost or Forgotten EID/UID वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर Aadhaar No (UID) यावर क्लिक करा. त्यानंतर समोर असलेल्या फॉर्ममध्ये नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आणि Captcha कोड टाईप करा. सेंड OTP वर क्लिक करा.
सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर, मोबाईल नंबरवर ६ किंवा ८ अंकी OTP येईल.
OTP टाईप केल्यानंतर मोबाईल नंबरवर आधार कार्डचा क्रमांक मिळेल.