मुंबई : अनेक कारणांमुळे तुमच्या किचनमध्ये असलेलं सिंक ब्लॉक होतं. तुमच्यासोबतंही असं घडलं असेल. म्हणूनच सिंकमध्ये काहीही फेकण्यापासून किंवा धुण्यापासून थोड्या गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. किचनमधील सिंक कधीही ब्लॉक होऊ नये यासाठी तुम्ही सिंकची योग्य काळजी घेतली पाहिजे. तुमच्या किचनमधील सिंक ब्लॉक होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला आज काही खास टीप्स देणार आहोत.
तुमच्या सिंकमध्ये गार्बेज डिस्पोजल लावलेलं नसेल तर तुम्ही सिंकमध्ये कोणतंही अन्न टाकू नका. सिंक ब्लॉक होऊ नये यासाठी ड्रेन स्ट्रेनरचा वापर करा. हार्डवेअर स्टोअरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेन स्ट्रेनर्स मिळतील. ते तुमच्या सिंकच्या ओपनिंगवर लावा जेणेकरुन कोणत्याही प्रकारच्या अन्नामुळे सिंक ब्लॉक होणार नाही.
जर तुम्हाला वाटतं की, तुमचा सिंक कधीही ब्लॉक होऊ नये तर सिंकमध्ये कधीही गरम तेल फेकू नका. कारण ते थंड झाल्यावर आत असलेल्या पाईपवर तेल गोठून राहतं. आणि यानंतर सिक ब्लॉक होण्याची शक्यता अधिक वाढते.
बहुतेकदा चहाची पावडर सिंकमध्ये फेकली जातात. ज्यामुळे सिंक ब्लॉक होऊ शकतं. चहाची पावडर सिंकमध्ये पसरू लागल्याने, सिंकचा एस-बँड बंद होऊ शकतो. म्हणूनच चहाची पावडर किंवा पानं कधीही सिंकमध्ये टाकू नये.
सिंक ब्लॉकेजपासून रोखण्यासाठी आठवड्यातून एकदा सिंकमध्ये गरम पाणी ओतलं पाहिजे. गरम पाणी सिंकच्या आत अडकणाऱ्या गोष्टी काढण्यास मदक करतं. पण एकाच वेळी सिंकमध्ये गरम पाणी टाकू नका. असं करताना हळूहळू गरम पाणी घालावं.