रामराजे शिंदे, झीमीडिया, कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुंकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. तृणमुलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरूद्ध भारतीय जनता पक्षात कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. नक्की कोणकोणते मुद्दे दोन्ही पक्षांसाठी या निवडणुकीत महत्वाचे ठरू शकतात. हे पाहूया
-अनेक राज्यांमध्ये महिलांनी भाजपला भरभरून मते दिली आहेत. त्यामुळे हा सायलेंट वोटर किंग मेकर ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल
-टीएमसीमधून आयात केलेल्या नेत्यांचा भाजपला किती फायदा होणार?
-2019 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये 121 विधानसभा मतदारसंघातून भाजप आघाडी मिळाली होती. त्यामुळे भाजपला याचा किती फायदा होतो हे पाहावं लागणार
-भाजपचा राजकीय हुकमी एक्का म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा चालणार का? मोदी फॅक्टर किती काम करतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
-दलित मतदारांचा भाजपला किती फायदा होणार? दलित मतदारांनी एकगठ्ठा -भाजपला मतदान केले तर राज्यातील दलित राजकारणात भाजप चांगली मुसंडी मारेल
------
-अनेक वर्षांपासून राज्य करणाऱ्या तृणमुल पक्षासाठी ही निवडणुक तेवढी सोपी नाही.
-कॉंग्रेसचा मतदार टीएमसीकडे शिफ्ट होईल का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
-मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिमा पाहात राज्यातील महिला मतदार त्यांच्या पाठीशी राहिल्या तर त्याचा टीएमसीला फायदा होऊ शकतो.
-मुस्लिम एकगठ्ठा पारंपारिक मते पुन्हा टीएमसीला मिळाली तर पक्ष निकालांत मुसंडी मारू श शकतो. परंतु या मतांत ध्रुवीकरण झाले तर चित्र वेगळे असू शकते.
-ममता बॅनर्जींचे पारंपारिक विरोधक असलेल्या डाव्यांचा त्यांना किती फटका बसतो. यावर अनेक विधानसभा मतदारसंघातील विजयाचे गणित अवलंबून आहे.